माॅडेल गावा साठी “स्वच्छता फोटो मोहीम’’
सोलापूर – स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२. हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गावात झालेल्या उत्कृष्ट कामावर ‘स्वच्छता फोटो मोहीम’’ केंद्र शासनाने हाती घेतली आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छतेवर चित्रपट स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
सोलापूर जिल्हयात २७२ ग्रामपंचायती माॅडेल या श्रेणी मध्ये आहेत. या गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांचे फोटो अपलोड करणे बाबत पाणी पुरवठा स्वच्छचा विभागाने सुचना दिलेले आहेत.
या गावात झालेल्या स्वच्छता विषयक उत्कृष्ठ फोटो केंद्र शासनाचे संकेतस्थळावर अपलोड करणे बाबत केंद्र व राज्य शासनाने सुचना दिलेले आहेत. या मोहिमेबाबत जनजगृती करणेचे सुचना गटविकास अधिकारी यांना देणेत आले आहेत. येत्या ३० नोव्हेबर पर्यंत या मोहिमेस मुदतवाढ देणेत आली आहे.
या कालावधीत झालेल्या कालावधीतील उत्कृष्ट दर्जाची छायाचित्र निर्मिती करून MYGOV.in पोर्टल वर अपलोड करणेबाबत केंद्र शासनाने सूचना देणेत आले आहेत.
राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट स्पर्धा
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-२. हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गावात झालेल्या उत्कृष्ट कामाच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट स्पर्धेचे आयोजन करणेत आले असल्याचे सिईओ आव्हाळे यांनी सांगितले. या स्पर्धेस केंद्र शासनाने दि. 30/11/2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. उत्कृष्ट दर्जाची चित्रपट निर्मिती करून केंद्र शासनाचे संकेतस्थळावर अपलोड करणेबाबत केंद्र शासनाने सूचना दिले आहेत.
त्या अनुषंगाने हागणदारी मुक्त अधिक मॉडेल गावातील उत्कृष्ट चित्रपट स्पर्धेबाबत तालुका व गाव स्तरावर चित्रपट निर्माते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.