सोलापूर दि.25(जिमाका):- जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणूकीचे मतदान दि.05 नोव्हेंबर 2023 रोजी होत आहे. या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील मतदानाच्या ठिकाणचा आठवडा बाजार भरविण्यास मनाई करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद निर्गमित केले आहेत.
माढा तालुक्यातील मौजे पिंपळनेर, करमाळा तालुक्यातील मौजे केम, माळशिरस तालुक्यातील मौजे दहिगाव,सांगोला तालुक्यातील मौजे चिकमहुद, मंगळवेढा तालुक्यातील मौजे खुपसंगी या ठिकाणचे आठवडी बाजार बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आर्शीवाद निर्गमित केले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा सुव्यवस्थाअबाीत राहावी तसेच मतदान प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला आहे.