मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे केंद्रात आणि राज्यात यांचेच सरकार आहे परंतु आरक्षण द्यायची मानसिकता सरकारची नाही. मराठा समाजाला आरक्षण देणे आजच्या घडीला अत्यंत गरजेचे आहे.
गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरलेला आहे , त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी प्राण पणाला लावलेले आहे. सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे अशा शब्दांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला.