काय तो उत्साह, काय तो जल्लोष एकदम धमाकेदार रास दांडीया
काल क्वीन्स क्लबच्या रास दांडीया इव्हेंटमध्ये गरबा आणि दांडीयाच्या गाण्यांवर सर्व क्वीन्सनी भन्नाट ठेका धरला होता. रंगीबेरंगी पोषाखात सगळ्याच क्वीन्स खूपच छान दिसत होत्या सेल्फीज आणि फोटोजचा मोह कोणालाच आवरला नाही. सगळ्यांनी खूप वेगवेगळ्या स्टाईलच्या स्टेप्स सादर करत गरबा आणि दांडीयाचा पूर्ण आनंद लुटला. निखिल भालेराव, मेघा हुल्लेनवरू, संदेश कांबळे यांची दमदार गाणी आणि कच्छी ढोल, रोटो, ड्रम सेट, किक अँड स्नेअर अशी अनेकविध वाद्यं साथीला असल्याने कार्यक्रम जबरदस्त झाला. अनीश सहस्रबुद्धे यांच्या अॅंकरींगमुळे कार्यक्रम उत्तरोत्तर खुलतच गेला. दीर्घायु आणि मयूरेश एंटरप्राइझेस प्रायोजित या इव्हेंटमध्ये ड्रेसिंग, हेअर स्टाईल आणि स्पेसिफीक दांडीया स्टेप्ससाठी स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी क्वीन्स क्लबच्या मेंबर मीनल शहा यांनी परीक्षक म्हणून आनंदाने सहकार्य केले.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे
- पहिलं बक्षीस – प्रियंका पवार
- दुसरं बक्षीस – हिरल भावसार
- तिसरं बक्षीस – विद्या होनमोडे
- चौथं बक्षीस – शिला कोरे
- पाचवं बक्षीस – राधा पवार
- सहावं बक्षीस – निशिगंधा झाडबुके
आम्हाला कधीच एवढा सेफ दांडीया एंजॉय करता आला नव्हता असे प्रत्येक क्वीनच्या तोंडी होते. इतका चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला यासाठी सर्व विजेत्यांनी, स्पर्धकांनी आणि सर्वच क्वीन्स क्लब मेंबर्सनी अनीश सरांचे पुन्हा पुन्हा आभार मानले.
क्वीन्स क्लबच्या विविधरंगी कार्यक्रमांमुळे आणि स्पाईस एन आईस इव्हेंट्सच्या उत्तम मनेजमेंटमुळे दिवसेंदिवस क्वीन्स क्लब लोकप्रिय होत आहे येणाऱ्या महिन्यांमध्ये एक से एक कार्यक्रमांच आयोजन करण्यात येणार आहे त्याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं अनीश सरांकडून सांगण्यात आलं