दर शुक्रवारी होणार मंद्रूप येथे लोकसंवाद कार्यक्रम
सोलापूर – दक्षिण तालुक्यात जे प्रसिद्ध आहे त्याचे मार्केटिंग करा, दक्षिण तालुका मतदारसंघ पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचा आहॆ त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे.सिंचनाच क्षेत्र वाढवण्यासाठी सिना भिमा जोड कालव्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़. त्याचा फायदा दक्षिण तालुक्याला होणार आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
आमदार सुभाष देशमुख यांच्या वतीने प्रथमच लोकसंवाद हा कार्यक्रम ग्रामीण भागात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मंद्रूप येथे पार पडला. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील लोकांना शहरात येऊन अडचणी सांगण्यास वेळ नसतो तसेच अधिकारीही उपस्थित नसतात त्यामुळे आता आ. सुभाष देशमुख यांनी दर शुक्रवारी लोकसंवाद कार्यक्रम मंद्रूप येथे घेण्याचे ठरवले आहे त्यानुसार शुक्रवारी पहिल्यांदाच ग्रामीण भागात हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरवसे यांनी केले. कार्यक्रमाला अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत हुल्ले, तालुका वैद्यकीय अधिकारी घोगरे , महावितरण चे मोहन आलाट हणमंत कुलकर्णी, डॉ. चनगोंडा हवीनाळे आदी उपस्थित होते. आलाट यांनी तुमची कोणतीही विजेच्या बाबतीतली गोष्ट असुद्या आमच सहकार्य कायम असेल, असे आश्वासन दिले.
गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी गावकऱ्यांनी अडचण पहिली आम्हाला बोला, आम्ही ती सोडवू असे सांगितले.पोलीस प्रशांत हूल्ले यांनी कोणतेही अवैध उद्योग करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगत तक्रारी असतील तर तुम्हाला न्याय निश्चित मिळेल, असे आश्वासन दिले.
अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी जास्तीत जास्त लोकाभिमुख प्रशासन राबविण्याच काम करत आहॆ. एकदिलाने रहा तुमची अडचण सोडवण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगितले.
हनुमंत कुलकर्णी यांनी आमदार सुभाष देशमुख यांना कायम लोकांशी संवाद साधण्याची सवय आहे त्यामुळेच ते आज ग्रामीण भागात पोहोचून लोकांशी संवाद साधत आहेत असे सांगत असा एकमान नेता आपण पाहिल्याचे आवर्जून सांगितले. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थिती होते.
नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवा: आ.देशमुख
या लोकसंवाद कार्यक्रमात तालुक्यातील विविध भागातून नागरिकांना त्यांच्या अडचणी निवेदनाद्वारे घेऊन आले होते. त्या सर्व अडचणी तात्काळ सोडवण्याचे आदेश संबंधित विभागाला आमदार देशमुख यांनी दिले. हा लोकसंवाद कार्यक्रम दर शुक्रवारी मंद्रूप येथे घेण्यात येईल, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले.