• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रोटरीच्या काश्मीर शिबिरामध्ये १२३५ मोफत शस्त्रक्रिया

Yes News Marathi by Yes News Marathi
October 11, 2023
in इतर घडामोडी
0
रोटरीच्या काश्मीर शिबिरामध्ये १२३५ मोफत शस्त्रक्रिया
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : रोटरी जिल्हा ३१३१ व ३१३१ यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा , शोंपिया व कुळगाम या चार जिल्ह्यांमध्ये नुकतेच मोफत शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. ४ ते १३ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या या शिबिरात १२३५ शस्त्रक्रिया मोफत झाल्याचे शिबिराचे आयोजक रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर राजीव प्रधान यांनी सांगितले.

शिबिरात स्त्रियांचे आजार, अस्थिरोग, कान – नाक – घसा, डोळे, कर्करोग, प्लास्टिक सर्जरी आणि लहान मुलांच्या शस्त्रक्रिया तसेच इतर जनरल शस्त्रक्रियांचा समावेश होता. यापैकी अनेक शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या होत्या . शिबिरामध्ये महाराष्ट्रातून व इतर राज्यांमधून 30 सर्जन आणि तीन स्वयंसेवक सहभागी झाले होते.

सोलापूर जिल्ह्यातून संजय मंठाळे, शशिकांत गंजाळे, असीत चिडगुपकर, मीनल चिडगुपकर, आनंद खडके , मनोज भायगुडे हे डॉक्टर आणि धनश्री केळकर सहभागी झाले होते. डॉक्टर मंठाळे यांनी कानाच्या व घशाच्या अवघड शस्त्रक्रिया पार पाडल्या . डॉक्टर गंजाळे व डॉक्टर असित चिडगुपकर यांनी पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया केल्या. अस्वलाच्या हल्ल्यात एक हात निकामी झालेल्या रुग्णावर डॉक्टर चिडगुपकर यांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली.

कातडीपासून हाडापर्यंत जखमी झालेला हात पूर्ववत करण्यात यश मिळाले. डॉक्टर खडके व भायगुडे या दोघांनी डोळ्याच्या अनेक शस्त्रक्रिया शोंपीया व पुलवामा येथे केल्या. एका लहान मुलीवर तिरळेपणा दूर करण्यासाठीची शस्त्रक्रिया डॉक्टर भायगुडे यांनी केली. डॉक्टर मीनल चिडगुपकर यांनी शिबिरातील काही दिवस अनंतनाग ते पुलवामा असा ऐंशी मिनिटे प्रवास करून स्त्रियांच्या आजारावरील शस्त्रक्रिया पार पाडल्या. डॉक्टर धनश्री केळकर यांनी अनंतनाग येथील रोटरीच्या ‘टीम’ चे समन्वयक म्हणून काम केले.

जम्मू काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रोटरीचे या शिबिराबद्दल कौतुक तर केलेच परंतु पुंछ व राजौरी या जिल्ह्यामध्ये असेच शिबिर भविष्यात घेण्याची विनंती केली. काश्मीरचा हा भाग अतिशय संवेदनशील समजला जातो . अनंतनाग येथे रोटरीची टीम कार्यरत असताना शेवटच्या दिवशी लष्करी तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन मोठे अधिकारी शहीद झाले. पुलवामा आणि शोपिंया ही गावे आणि इतर गावांना जोडलेले रस्ते रात्री पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात असतात . अशा प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातील वैद्यकीय तज्ञांनी त्यांची सेवा देण्यासाठी धाडस दाखवले.

काश्मीर सरकारने या शिबिरासाठी महत्त्वाचे कार्य केले. काश्मीरच्या आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन दोन महिने रुग्णांची निवड केली. शस्त्रक्रियांसाठी लागणारी औषधे, साधनसामग्री राज्य सरकारने उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे काही उपकरणे, तसेच ऑपरेटिंग मायक्रोस्कोप सरकारने इतर जिल्ह्यातून शिबिरासाठी मागविले होते. जवळपास १०० रुग्णसेवक या शिबिरासाठी दिवस- रात्र काम करीत होते. या सर्व रोटरी टीम आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून या शिबिरात १२३५ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. काश्मीरमधील सर्व-सामान्य जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हे एक छोटेसे परंतु महत्त्वाचे पाऊल पडले, असेच म्हणावे लागेल. रोटरीची अशाप्रकारे देश-विदेशात २८ शिबिरे पार पाडणाऱ्या माजी प्रांतपाल डॉक्टर राजीव प्रधान यांच्या कुशल नेतृत्वामुळे हे यश मिळाले.

Tags: 1235 free surgeriesKashmir campRotary Club
Previous Post

NIA ची छापेमारी; PFI विरोधात महाराष्ट्रासह देशात २० ठिकाणी कारवाई

Next Post

IND vs PAK सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी, रजनीकांत, बच्चन, सचिनला आमंत्रण

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
IND vs PAK सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी, रजनीकांत, बच्चन, सचिनला आमंत्रण

IND vs PAK सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी, रजनीकांत, बच्चन, सचिनला आमंत्रण

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026