लोकमंगल बँकेच्या एक खिडकी योजनेअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेत लाभ घेणाऱ्या ग्राहकांच्या सेवा व सोयीकरिता बँकेत आज एक खिडकी योजनेचा शुभारंभ नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ,बँकेचे संचालक अभिजीत टाकळीकर ,सतीश लामकाने, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस साहेब, मुख्य शाखेचे व्यवस्थापक निशांत देवडकर, कर्ज विभाग प्रमुख राजाराम पवार, बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे, अनिता जगदाळे विनायक यरगल यांच्यासह बँकेचे सभासद,ग्राहक,कर्जदार आदी उपस्थित होते.
या एक खिडकी अंतर्गत ग्राहकांना पात्रता प्रमाणपत्र काढून देणे,कर्ज मजुरी पत्र अपलोड करणे,दरमहा व्याज परतावाचा क्लेम अपलोड करणे इ.कामे या एक खिडकी द्वारे बँकेत सेवा दिली जाईल.