नवी दिल्ली: मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. जरी ही विधानसभा निवडणूक असली तरी आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनलच आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाच्या निवडणुका या लोकसभेबरोबरच होणार असल्याच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. कारण आज दुपारी 12 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत या पाच राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. साधारण नोव्हेंबरचा दुसरा आठवडा किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकांचे वेळापत्रक काय असणार याची उत्सुकता सर्वांना आहे.