विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक संपन्न ; विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी सर्व विभागांना खा. महास्वामीजी यांच्या सूचना
सोलापूर – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत सोलापूर येथील विमानतळावर विमानसेवा सुरू करण्यासाठी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक संपन्न झाली. प्राधिकरणाच्या विविधस्तरावर प्रयत्न सुरू असलेल्या प्रयत्नांची आढावा बैठकीच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेतला. यामधे सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून विमानसेवा लवकर सुरू होण्यासाठी समन्वयाने कामे करण्याच्या सूचना खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी दिल्या.
शनिवारी दुपारी खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विमानतळ प्राधिकरण समितीच्या बैठकीत सदस्य विक्रम देशमुख, राजशेखर हत्ती, उद्योजक राम रेड्डी, डॉ. अग्रजा वरेरकर सदस्य तथा संबंधित अधिकारी उपस्थित होते. खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या सूचनेनुसार यापूर्वी 10 जुलै 2023 रोजी व स्थानिक प्रशासन बरोबर 14 जुलै 2023, 23 ऑगस्ट 2023, 6 सप्टें 2023 रोजी सर्व आयोजित बैठकांमध्ये या सर्व विषयावर संबंधित विविध विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत बैठकित प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सध्या परिस्थितीमध्ये कोणत्या स्थितीत आहेत त्याचा आढावा घेण्यात आला. वेळोवेळी पाठपुरावा करूनही विलंब न होता मर्यादित वेळेत सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.
सध्या, रनवे, संरक्षण भिंत, इतर बांधकामे यासाठी सुमारे ४३ कोटी रुपयांच्या कामाची निविदा निघाली आहे. त्यासाठी ऑक्टोबर अखेरची मुदत असून नोव्हेंबर महिन्यात लवकरात लवकर कामे सुरू करण्याच्या सूचना खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी दिल्या. याकामी केंद्रीय विमान उड्डाण मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना विमानसेवा सुरू होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यास केंद्रीय उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण झाल्यानंतर तात्काळ आवश्यक ती लायसन्स प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे लेखी खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांना कळविले होते. त्यानुषंगाने ही कामे मर्यादित वेळेत पूर्ण होण्यासाठी शनिवारी खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक आयोजित केल्याचे सांगितले.
यामधे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाचे 7 इलेक्ट्रिक पोल ची ऊंची कमी करणेसाठी डी.जी.सी.ए.च्या सूचनेनुसार 14 जुलै 2023 च्या बैठकीत संबंधित अधिकारी सूचना दिल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष लाइन अंडर ग्राऊंड करुण घेण्यासाठी ऑक्टो 2023 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी दिल्या. तसेच बी.एस.एन.एल.चे टॉवरची ऊंची कमी करणेसाठी सुचना दिली होती. त्यानुसार त्यांचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच डी.आर.एम सोलापूर रेल्वेचे मास्टची ऊंची कमी करणे संबंधित विभागाकडून काम सुरू केले आहे. सोलापूर विमानतळावर विमान सेवा सुरू करण्यासाठी ही तिन्ही कामे त्वरित मार्गी लावणे अत्यंत आवश्यक आहेत तरी त्या बाबतच्या सूचना संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले असून येत्या महिना अखेर त्या पूर्ण कराव्यात अश्या सूचना खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी दिल्या.
विशेषतः प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमीनीपैकी महाराष्ट्र शासनाचे नावे असलेल्या जमिनीवर भारतीय विमानपतन प्राधिकरणाचे नाव लावणे बाबतच्या प्रकरणी तसेच प्राधिकरणाच्या संपादित मालकीच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण दूर करण्याकरीता प्रशासकीय स्तरावर, न्यायालयीन स्तरावर, योग्य ते सहकार्य करून लवकरच त्या ही सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्यात असेही खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी म्हणाले. महापालिकेच्या मार्फत स्थानिक सुविधा म्हणजे नळ कनेक्शन, ड्रेनेज कनेक्शन, कचरा व्यवस्थापन ई. कामासाठी मनपा आयूक्त यांनी लवकरात लवकर कार्यवाही करून कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी महसुली नोंदी संदर्भात युद्ध पातळीवर काम करुन रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक खा. डॉ. महास्वामी यांनी व्यक्त केले.