सोलापूर : महिला या विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. संसाराबरोबर देश विकासात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. घरात अधिक मतभेद व वाद न करता समन्वय साधला तर स्त्री- पुरुष समानता खऱ्या अर्थाने प्रस्तापित होईल. महिलांनी संगणक साक्षरतेसह आधुनिक ज्ञानाची कास धरावी असे आवाहन महाराष्ट्र वीरशैव सभा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पुष्पा गुंगे यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला. त्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी विचार मंचावर माहेश्वरी प्रगती मडळचे महिला सदस्य दिपा फोफलिया, जेष्ठ महिला नागरिक माहेश्वरी धरणे, श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ज्योती कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
गुंगे पुढे म्हणाल्या स्त्री-पुरुष समानता महत्वाची आहे. त्याचे संस्कार कुटुंबातच झाले पाहिजेत असे सांगत श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या कार्य गौरवास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला आघाडीचे सदस्य सुजाता सक्करगी यांनी केले. सुत्रसंचालन माधुरी चव्हाण तर आभार अक्षता बच्चल यानी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपा कुताते, पद्मा वेलापुरे, अंजली शिरसी, नर्मदा कनकी, प्राजक्ता जाजू, सारिका मदने, शुभांगी लचके, निशा केकडे, अनिता रेळेकर, सुवर्ण शहा, प्रतिक्षा शहा, अर्चना बंडगर, रेखा गायकवाड, पुष्पा हलकुड़े, धनश्री काटकर, सुप्रिया स्वामी, रेखा लकडे, स्नेह देशमुख आदीनी परिश्रम घेतले.
आदर्श महिला पुरस्काराचे मानकरी
मीरा कटकधोंड (स्वंयपाकी), सुवर्णा लकडे (फोटो एडिटिंग), मीनाक्षी कोळी-मानवी (सेविका), सुलुबाई पुजारी (घरकाम), अनुपमा पाणसे (केअर टेकर)आदि पाच मान्यवर महिलांचा पुरस्काराने गौरविण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र , शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.