• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुसेसावळी येथील मुस्लिमविरोधी हिंसाचाराचा निषेधार्थ माकपचे जोरदार धरणे आंदोलन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 27, 2023
in इतर घडामोडी
0
पुसेसावळी येथील मुस्लिमविरोधी हिंसाचाराचा निषेधार्थ माकपचे जोरदार धरणे आंदोलन
0
SHARES
1
VIEWS

दोषींवर कडक कारवाई करावे आणि राज्य सरकार कडून मयत कुटुंबीयांना पंचवीस लाख रू मदत द्यावे- कॉ.एम एच. यांची मागणी

सातारा जिल्ह्यात करण्यात आलेल्या या धर्मांध हिंसाचाराचा आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा कडक निषेध करत आहोत.पुसेसावळी येथे हत्या करण्यात आलेल्या युवकाच्या कुटुंबियांना राज्य सरकारने पंचवीस लाख रुपयांची मदत करावी, गेले सहा महिने समाजात धार्मिक विद्वेष पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या गैरवापराचा सखोल तपास करावा, सर्व गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, या हिंसाचारात झालेल्या नुकसानीचे नव्याने पंचनामे करावेत अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे असे प्रतिपादन माकपचे चे जिल्हा सचिव ऍड.एम.एच शेख यांनी केले.

बुधवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद पूनम गेट येथे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे मुस्लिम समाजावर हिंसक हल्ला व तरुणाच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तीव्र धरणे आंदोलन सिटू चे राज्य सचिव ऍड एम.एच.शेख यांच्या नेतत्वाखाली करण्यात आले.

९ सप्टेंबर, २०२३ रोजी सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात मुस्लिम समाजावर भयानक हिंसक हल्ला करण्यात आला. त्यात एका उच्च विद्याविभूषित मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आली. तसेच, कित्येक निरपराध नागरिक गंभीर जखमी झाले.

राज्य सरकार राज्यातील अल्पसंख्याक आणि दलितांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे, हेच सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांवरून दिसून येते.

गेले काही महिने सातारा जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने मुस्लिम समाजाच्या विरोधात भावना भडकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचीच परिणती पुसेसावळीच्या शोकात्म आणि संतापजनक घटनेत झाली आहे. परिस्थिती प्रक्षोभक झाली असल्याचे माहीत असूनही पोलीस आणि प्रशासनाने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले.

या हिंसाचारास भाजपचे राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप सातारा जिल्ह्यातील स्थानिक नागरिक जाहीरपणे करत आहेत. मुस्लिम तरूणांचे मोबाईल हॅक करून त्यावरून मुद्दाम चिथावणीखोर संदेश पाठवण्याचे कारस्थान जिल्हाभर राबवले जात असल्याचे दिसून आले आहे.

शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही अशाच प्रकारच्या घटना घडवण्यात आल्या आहेत. कांही विघ्नसंतोषींकडून हिंदू-मुस्लिम सलोखा जाणीवपूर्वक उध्वस्त केला जात आहे. कायद्याच्या राज्याला आव्हान देणाऱ्या या गुन्हेगारी टोळक्यांचा बंदोबस्त करणे ही राज्य शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.

यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे कॉ.सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ.कमिनीताई आडम, कॉ नसीमा शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व्यंकटेश कोंगारी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्ता चव्हाण यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कॉ सिद्धप्पा कलशेट्टी, कॉ व्यंकटेश कोंगारी, म.हनिफ सातखेड,शेवंताताई देशमुख, सुनंदा बल्ला, कमिनीताई आडम,शंकर मिस्त्री, मारेप्पा फंदीलोळू, लिंगव्वा सोलापूरे, शकुंतला पाणीभाते,बापू साबळे, नरेश दुघाणे, दीपक निकंबे,पुष्पा पाटील, किशोर मेहता,बाबू कोकणे,शहाबुद्दीन शेख, सनी शेट्टी,अमित मंचले,हसन शेख,रफिक काझी,वसीम मुल्ला, वसीम देशमुख,जावेद सगरी,मोहन कोक्कुल, आरिफा शेख, मोहोम्मदी शेख, कादर शेख, शाम आडम,मल्लेशम कारमपुरी,आदींनी परिश्रम घेतले.

Tags: anti-Muslim violencemovement of CPI(M)protestPusesawali
Previous Post

कायझन मोटार्सचे नितीन बिजर्गी आणि जनकल्याणचे हजारे यांच्या हस्ते गणरायाची पूजा

Next Post

अमर बिराजदार यांनी बांधकाम क्षेत्रात ग्राहक अन् विक्रेत्याचा सांधला पूल

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
अमर बिराजदार यांनी बांधकाम क्षेत्रात ग्राहक अन् विक्रेत्याचा सांधला पूल

अमर बिराजदार यांनी बांधकाम क्षेत्रात ग्राहक अन् विक्रेत्याचा सांधला पूल

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026