२६ अभियंत्याचा व गुणवंत पाल्यांचा गौरव
सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात देखील किल्ले बांधून घेतले. आजही किल्ले अभेद्य आहे. अभियंत्यांनी कामाला कल्पकतेची जोड द्यावी.जेणे करून काम पाहून नाव घेतले पाहिजे असे काम करा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज अभियंता दिना निमित्त सर विश्वेश्वरय्या यांची जयंती व उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करणेत आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे या होत्या. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिनकर महिंद्रकर प्रमुख उपस्थित होते. या प्रसंगी २६ अभियंतां यांचा सपत्नीक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करणेत आला. तसेच गुणवंत पाल्यांचा सत्कार सिईओ मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आला.
छोट्यातले छोटे काम करा पण चांगले काम करा असे सांगून सिईओ मनिषा आव्हाळे म्हणाले, स्वतच्या कल्पकतेची जोड द्या. आजचे युगात जे तंत्रज्ञान आहे त्यांची जोड द्या. त्याला गुणवत्ता नक्की येईल. पुढच्या २० वर्षे या कामांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. शाळा असे प्राथमिक केंद्र, जलजीवन मिशन, आदी कामे गुणवत्तेची करा असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले.
बाबा मला इंजिनियर हो म्हणायचे…!
माझे बाबा मला इंजिनियर हो म्हणायचे. त्यानंतर आयएएस हो असा सल्ला दिला होता मी विधी विभागा पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर आयएएस झाले. कुठल्याही शाखा आपण एका चौकडीत बसवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खुप मोठे व्हीजन होते. ते म्हणायचे समुद्रात किल्ले बांधा. त्यांनी समुद्रात किल्ले बांधून दाखविले असेही सिईओ आव्हाळे यांनी सांगितले.
शाबासकीची थाप कामाला प्रोत्साहन देते – अतिरिक्त सिईओ कोहिणकर
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर म्हणाले, जलजीवन मिशन, बांधकामे १ व २ तसेच जनसुविधा व इतर कामे अभियंत्यांनी केली आहेत. ४० टक्के पेक्षा अधिक कामे पुर्णत्वाकडे आहे. कधी तरी काम करीत असताना शाबासकीची थाप पाठीवर मिळाली कि काम करणेस प्रेरणा मिळते. असेही अतिरिक्त सिईओ कोहिणकर यांनी सांगितले.
कामात जीव ओतला तर काम करणेस आनंद मिळतो. अभियंत्याचे देशाच्या उभारणीत मोठे योगदान आहे. असे मत कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी कार्यकारी अभियंता पंडित भोसले, उप अभियंता सुनील कटकधोंड, उप अभियंता सुरेश कमळे, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, लिपिकवर्गीय कर्मचारी संघचनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, प्रमुख उपस्थित होते. शाखा अभियंता सोनाली कदम, रविशंकर बोधले, आयुब शेख, सिध्दाराम बोरूटे, सचिन पवार, सुंदर हस्ताक्षर असलेले अभिमन्यु कांबळे, शाखा अभियंता मुजावर, मेघराज कोरे, अभियंता चेतन वाघमारे, माजी उप अभियंता रमेश चौगुले , चेतन भोसले यांनी कार्यक्रम यशस्वी करणे साठी परिश्रम घेतले. प्रास्तविक कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी केले सुत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले.तर आभार रवीशंकर बोधले यांनी आहार मानले