पाऊस पडण्याबरोबरच सोलापूरच्या सुख, शांती आणि एकात्मतेसाठी साकडे!
तिसरा श्रावणी रविवार : भक्त मंडळ व वीरशैव व्हिजनचा उपक्रम
सोलापूर : तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंग पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भक्तगणांनी हर्रर्र बोला हर्रर्र… चा जयघोष करीत पाऊस पडण्याबरोबरच सोलापूरच्या सुख, शांती आणि एकात्मतेसाठी साकडे घातले.
बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, राजेश नीला, प्रा. संजय नीला, प्रा. शिवकुमार बिरादार, डॉ. श्रुती पाटील, डॉ. विश्वनाथ पाटील, जिल्हा परिषदेचे सहायक प्रशासनाधिकारी संगीता सुलगडले, अष्टगंध मानकरी संजय भोगडे, होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण, सुजाता कुमणे, राज सारंगमठ, सुनीता देवस्थळी, संगीता जत्ती, सावित्री कडगंची, सरिता तंबाके, सुरेखा कीर्तने महादेव माने, भीमाशंकर सोलापुरे, गणेश मादुगुंडी, विजय सातपुते, राज सारंगमठ, अजय मोरे, प्रियंका उदाणे, पार्वती सवळी, भीमाशंकर केदार, संजय फुले, राजश्री आईगोळे, राजश्री दोडमणी, सुमित्रा हुल्लेनवरू, राजू देवरमणी, शिवराज डोंबे आदी भक्तगण सहभागी झाले होते.
सकाळी 7 वाजता बसवराज सावळगी यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पदयात्रेचा समारोप दुपारी 3 वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आला. विशेष करून या पदयात्रेत महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय होता. यावेळी बापूजी नगर येथील शांतवीर भजन मंडळाच्या सदस्यांनी 68 लिंग व सिद्धेश्वरांवरील भजनगीते गायली.
पदयात्रेच्या मध्यंतरात मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालय येथे दीपकभाऊ निकाळजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यावतीने तर पदयात्रेच्या समारोपाचे ठिकाणी श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे शांत वीर भजन मंडळाचे भजन गायक मल्लेश पेद्दी यांच्यावतीने फराळ व चहापान देण्यात आला. पदयात्रेच्या यशस्वीतेसाठी महेश माळगे-स्वामी, अविनाश हत्तरकी, सिद्धेश्वर कोरे, बसवराज बेऊर, मल्लिनाथ सोड्डे, महेश गुड्डद दीपक पटणे, महादेव कलशेट्टी, यांनी परिश्रम घेतले.