देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी येथील हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरच्या विद्यार्थिनींनी सुमारे चारशे राख्या व शुभेच्छा पत्र रक्षाबंधना निमित्त सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी पाठवण्यात आले आहेत. यावेळी
प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, प्रा संदीप पाटील, प्रा अजित देवसाळे, प्रा डी ए गोरनाळे, प्रा बी आर पाटील, प्रा अमोल कस्तुरे, प्राध्यापिका शिरिषा कुडल आदी उपस्थित होते.
तसेच महाविद्यालयातील एनसीसी मधील विद्यार्थिनींनी
कॅप्टन प्रा. संदीप पाटील व प्रा. अजित देवसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभेच्छा संदेश व राख्या सैनिकासाठी तयार केल्या आहेत. विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर सैनिकी जीवन व सैनिक हेच देशाचे खरे हिरो आहेत, सैनिकांचा त्याग, देशप्रेम, शिस्त, स्वावलंबन आदि गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजेत हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच रक्षाबंधन बहिण भावाच्या स्नेहभावनेला जागृत करणारा भारतीय सण यातच भारतीय वीर सैनिक आपल्या परिवारापासून कोसोदूर राहून आपल्या भारत मातेची सेवा डोळ्यात तेल घालून दिवसरात्र करत असतात.त्यामुळे हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरच्या विद्यार्थिनींनी 38 महाराष्ट्र बटालियन सोलापूर मध्ये भारतीय सैनिका सोबत सैनिकांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला. सीमेवर तैनात सैनिकांमुळे आज स्वतंत्रपणे सर्वजन सोहळे साजरे करता येतात मात्र हे सैनिक आपल्या कुटुंब्यांपासून लांब राहून कर्तव्य पार पाडतात देशाचे संरक्षण करतात, सीमेवर भारतीय जवान चोवीस तास पहारा देत असतात. त्यांच्या प्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी कर्नल विक्रम जाधव यांनी विद्यार्थ्यांना व एनसीसी कॅडेट्सना मोलाचे मार्गदर्शन केले ते म्हणाले की ते म्हणाले की विद्यार्थिनींनी सक्षम बनले पाहिजे, भविष्यात सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रात सर्व क्षेत्रात सक्षम बनून पुढे आले पाहिजे असे मत विक्रम जाधव यांनी केले. या वेळी कर्नल राजेश गजराज, कर्नल विक्रम जाधव, सुभेदार मेजर अरुण ठाकूर, सुभेदार आण्णाराव वाघमारे, सुभेदार रामचंद्र व सर्व पीआय स्टाफ उपस्थित होते.