अभियानाची सेवा पुस्तकात नोंद घेणेची सुचना
सोलापूर – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्ह्सात ODF plus ग्रामपंचायती सर्वाधिक होणे साठी विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन दि. १० आॅगष्ट ते ३१ आॅगष्ट या कालावधीत करणेत आले आहे. या अभियानाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा पुस्तकात विशेष नोंद घेणेत येत आहे. या विशेष स्वच्छता अभियान प्रभावी पण राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
शिवरत्न सभागृहात जिल्हा स्तरीस बैठकीत या विशेष अभियानाच्या सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिरकले, शिक्षणाधिकारी संजय जावीर, यांचे सह विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत दिनांक 1 ऑगस्ट 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविणे बाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्य पाणी व स्वच्छता मिशन
अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चे अभियान संचालक यांनी हे अभुतंना यशस्वी करणे साठी सुचित केले आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारी मुक्त अधिक ओडिएफ प्लस गावे म्हणून घोषित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने गाव पातळीवर दृश्यमान स्वच्छतेवर चळवळ उभी करणेत येत आहे. पुढील ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी विविध उपक्रम राबविण्याचे सूचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिले आहेत.सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपंचायत मध्ये करण्यात यावी. सर्व माध्यमिक शाळा , सर्व प्राथमिक शाळा, सर्व महिला बचतगट,
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत दिनांक 1 ऑगस्ट 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत ग्रामपंचायती, शाळां मध्ये उपक्रम राबविण्याच्या सुचना सिईओ यांनी दिले. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी खालील गटविकास अधिकारी यांनी पंचायत तालुका स्तरावर सनियंत्रण कराव. तालुक्यातील सर्व गावांना उपक्रमाच्या सनियंत्रणासाठी संपर्क अधिकारी यांची नेमणूक करावी. तालुकास्तरावरील सर्व विभाग प्रमुखांना कर्मचारी यांना उपक्रमांत सहभागी करून घेण्यात यावे. वेळापत्रकानुसार घेण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा घेणेत येणार असल्याचे सिईओ आव्हाळे यांनी सांगितले.
उमेद अभियान, सर्व ग्रामपंचायत विभाग, माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी विभाग या अभियानाशी जोडलेत आले आहेत. असेही सिईओ आव्हाळे यांनी सांगितले.
याबाबत तालुका स्तरावरून नियोजन करून स्वच्छता विषयक जनजागृती करणेत यावी. या अभियानाचे फोटो केंद्र व राज्य शासनाचे संकेतस्थळावर अपलोड करणेत येणार आहेत. तसेच या उपक्रमा सी social media चा वापर अधिकाधिक करणेवर भर देणेचे सुचना सिईओ आव्हाळे यांनी दिले आहेत. . जेणे करून लोकांपर्यंत अधिकाधिक पोहचता येईल. झालेले उपक्रमाचे अपडेट देणेत यावेत. या अभियानाच्या यशस्वीते साठी सर्वानी प्रयत्न करावेत. अशा सुचना सिईओ आव्हाळे यांनी दिल्या. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली.
प्रत्येक उपक्रमाची जिल्हा स्तरावर दखल – प्रकल्प संचालक जाधव
विशेष स्वच्छता अभियाना बाबत सिईओ यांनी जिल्हा स्तरावर नोंदी घेणेचे सुचना दिले आहेत. पोस्टर स्पर्धा, पेटींग्ज स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, कविता स्पर्धा, टाकाऊ वस्तूपासून टाकाऊ वस्तू तयार करणे, कचरा वर्गीकरण, मासिक पाळी व्यवस्थापन, युवा दिन, महिला बचतगट बैठक, सार्वजनिक शौचालय स्वच्छता, कापडी पिशव्यांचा वापर, स्वच्छता रॅली, उत्कृष्ट छायाचित्र स्पर्धा, प्लास्टिक वस्तूंचा वापर घटविणे साठी दुकानदार यांचेशी संवाद, सार्वजनिक जलस्त्रोत स्वच्छता मोहिम, शालेय पथनाट्य, व्हीडीओ शो, गावातील पारंपारिक अस्वच्छ जागेची स्वच्छता, ओल्या कचरा पासून गांडूळ खत आदी विशेष उपक्रम घेणेत येणार आहेत. असेही प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सांगितले.