मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इंदोरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिलाय. महाराजांवरील गुन्हा रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून सत्र न्यायालयात खटला चालणार आहे.
सम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषय तारखेला केल्यावर मुलगी होते, या वक्तव्यामुळे निवृत्ती महाराज इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराजांच्या या वक्तव्यावरून अहमदनगरमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. रंजना गवांदे आणि अॅड. जितेंद्र पाटील यांनी याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने हा खटला रद्द केला होता. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करत संगमनेर कोर्टात खटला चालवण्याचे निर्देश दिले होते.
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला इंदोरीकर महाराजांनी सर्वोच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्याची याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. इंदोरीकरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून आता सत्र न्यायालयामध्ये आता परत खटला चालणार आहे.