सांगली (सुधीर गोखले) – तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बी आर एस पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव काल महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे आदरांजली सभेला हजेरी लावली तसेच दुपारच्या वेळी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या साखराळे येथील निवासस्थानी भोजन केले यावेळी रघुनाथ पाटील यांनी बी आर एस पक्षात आपल्या सहकाऱ्यांसमवेत प्रवेशही केला यावेळी छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव म्हणाले कि महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्यांशी प्रश्नांशी कसलेही देणेघेणे नाही फक्त रघुनाथदादांच्या पक्ष प्रवेशाने खऱ्या अर्थाने आता शेतकऱ्यांना न्याय मिळेल येत्या ९ ऑगस्ट रोजी इस्लामपूर येथे भव्य शेतकरी मेळावा आपण घेणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
बी आर एस पक्षाने तेलंगणा मध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज पाणी देऊ केले आहे इतर सवलती देऊ केल्या आहेत भविष्यामध्ये देशामध्ये आमचाच पक्ष शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा राहील त्यांना न्याय देऊ शकेल. यावेळी शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी सरकार आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले आम्ही सगळ्या पक्षांना पाठिंबा देऊन पहिला पण शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय कोणत्याही सरकारने घेतले नाहीत शरद पवार हे आलीबाबा असून बाकीचे सर्व चाळीस चोर आहेत बी आर एस पक्षाने पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय त्यांच्या राज्यात घेतले आहेत आता महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये या पक्षाची पाळेमुळे आम्ही घट्ट करू. इस्लामपुरमधल्या होणाऱ्या भव्य मेळाव्यात सर्व पक्षांना चले जाव चा नारा आम्ही देणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी भगीरथ भालके, बी जी पाटील हणमंत पाटील गणेश आवळे आदींसह शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.