सोलापूर: स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आज राज्यभर खड्डे बुजवा व अपघात वाचवा हे आंदोलन घेण्यात आले होते तरी यांच्या आदेशानुसार सोलापुर शहरात स्वराज्य संघटनेच्या वतीने विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशुतोष तोंडसे यांच्या नेतृत्वाखाली सोरेगाव या ठिकाणी खड्डे बुजवा – अपघात वाचवा असे आंदोलन खराब रस्त्याचा निषेध म्हणून रस्त्यावर झाडे लावून आंदोलन घेण्यात आले होते.
तरी सोरेगाव येथे सार्वजनिक आरोग्य केंद्र व शाळा व महाविद्यालय यासाठी असलेला रोड अनेक वर्ष खराब अवस्थेत आहे. येथील सार्वजनिक आरोग्य केंद्राला गर्भवती महिला व लहान मुलांना लसीकरणासाठी घेऊन जावे लागत आहे. रस्त्याचे काम अर्धवट झाले असून तरी आहे सततचा पाऊस पडल्याने येथे चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. यासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते..रस्त्याचे काम लवकर पुर्ण करावे अशी मागणी शासनाकडे करण्यात आले आहे. या आंदोलनास आशुतोष तोंडसे, डाॅ. राजश्री पवार, संतोष पवार , एजाज हुंडेकरी, नामदेव वाघमारे, रवी शिंदे, विशाल अडगळे, संतोष जाधव, इमरान प्रदीप घोगरे, किशन शिकारे ,कृष्णा पवार, जॅक्सन महापुरे आधी उपस्थित मान्यवर उपस्थित होते..