सोलापूर – वस्तू व सेवा कर कार्यालय सोलापूर येथील नष्टीकरणास पात्र अभिलेख नष्टीकरण करून निर्माण झालेल्या रद्दीचे दर पत्रक पध्दीने लिलाव विक्री करावयाची आहे. त्यासाठी इच्छुक व्यक्ती अथवा व्यापारी यांच्याकडून दर प्रति किलो पध्दतीने दर पत्रक मागविण्यात येत आहे.
पात्र अभिलेख नष्टीकरण करून निर्माण झालेल्या रददीचे दर पत्रक बंद लखोटयात समक्ष दिनांक 07 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 04.00 वाजेपर्यंत कॅबिन क्र.103, पहिला मजला राज्यकर उपायुक्त ( अध्यक्ष अभिलेख नष्टीकरण समिती ) वस्तू व सेवाकर कार्यालय ,सोलापूर यांच्याकडे पाठवावेत
सदर नष्टीकरण पात्र अभिलेख (रद्दी) बघण्याची व्यवस्था या कार्यालयात दि. 07ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यत केलेली आहे. प्राप्त दरपत्रके दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता राज्यकर उपायुक्त SOL-VAT-E-003 (अध्यक्ष ,अभिलेख नष्टीकरण समिती ) कॅबिन क्र.103 पहिला मजला , वस्तू व सेवा कर कार्यालय ,सोलापूर यांच्या दालनात उघडण्यात येतील व त्याप्रमाणे सर्वाधिक दर असणाऱ्या व्यक्ती अथवा व्यापाऱ्याची निविदा मंजूर करण्यात येईल. दरपत्रक मंजुर करणे अथवा रदद करण्याबाबतचा सर्व अधिकार समितीस राहिल. असे आवाहन राज्यकर उपआयुक्त डॉ.बाळासाहेब मालेगावकर यांनी केले आहे.