सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ,कुचन प्रशालेतील इ. 8 वी चा चेतन बालाजी वडनाल या विद्यार्थ्यास भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल इनोवेशन फाऊंडेशन तर्फे इन्स्पायर अवॉर्डसाठी मानांक मिळाले. चेतन वडनाल याच्या दिव्यांग व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणारे मॉडेल (Height-adjustable Wash Basin for Persons with Disability) तयार करण्याच्या संकल्पनेस हे मानांक मिळाले. या अंतर्गत त्यास रु.10000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त.) शिष्यवृत्ती मिळाली आहे..
याप्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे खजिनदार नागनाथ गंजी व विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या हस्ते शिष्यवृती प्राप्त विद्यार्थ्यास सन्मानपत्र देण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल , मल्लिकार्जुन जोकारे व पालक बालाजी वडनाल उपस्थित होते.
चेतन वडनाल यास विज्ञान शिक्षिका अश्विनी म्हैसूर आणि वर्गशिक्षक अविनाश जतकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाप्रित्यर्थ पद्मशाली शिक्षण संस्थचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप , सहसचिवा संगीताताई इंदापूरे, शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिटयाल व संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.