सोलापूर – सिटीजन सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आज कारगिल विजय दिवसाच्या 24 व्या वर्धापनदिनानिमित्त ऐक्य, अखंडता शांतता, मैत्री आणि आपल्या राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या महान सैनिकांना श्रद्धांजली म्हणून सिटीजन सोसायटी ऑफ इंडियाच्या सदस्यांचे शिष्टमंडळ कन्याकुमारी येथून “युद्ध स्मारकाची प्रतिकृती” आणि “श्राधांजली कलश” घेऊन आज सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन झाले.
आगमन झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी सोपान टोम्पे- पाटील व महानगरपालिकेच्या वतीने नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने उपायुक्त विजय काबाडे यांच्या हस्ते “युद्ध स्मारकाची प्रतिकृती” आणि “श्राधांजली कलश” पूजन करून व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे,जिल्हा सैनिक कार्यालयाचे राजे सहाब शेख,उमेश राठोड,मिथुन ताकमोगे, गंगाधर तेत्यागे,आशा किवडे, कॅप्टन एस के पाटील, सुभेदार अण्णाराव वाघमारे, कुमार संतोष,नायक सुभेदार सुमंत यादव, हवालदार सुदाम सैदाडे, संजीव प्रतापसिंग तसेच एनसीसी चे संतोष कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.