सांगली ( सुधीर गोखले ) – शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील बिळाशी गावामध्ये १४ तर मांगरूळ येथे ५ ठिकाणी अशा एकूण १९ घरांवर चोरटयांनी डल्ला मारला आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बंद घरे बघून चोरटयांनी या घरांवर आपले हात साफ केले.
या भागात राहणारे बहुसंख्य कुटुंबे मुबई मध्ये वास्तव्यास आहेत या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असून रात्री उशिरा पर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.
शुक्रवारी पहाटेचार च्या दरम्यान चोरटयांनी आपला मोर्चा बिळाशी येथील या बंद घरांकडे वळवला यामध्ये भास्कर शामराव शिंदे, डॉ दिनकर झाडे, शहाबुद्दीन बाबालाल मुलाणी, सर्जेराव रामचंद्र लोहार, मोहन शिंदे तसेच भगवान आनंद शिंदे आणि धनाजी पांडुरंग साळुंखे यांची दोन घरे तर डॉ संभाजी फडतरे यांचा दवाखाना चोरट्याईन लक्ष केला. तर मांगरूळ परिसरातील पाच घरांवर चोरटयांनी घराची कडी कोयंडा तोडून हात साफ केले. हि माहिती मिळताच सांगलीतून श्वान पथकास पाचारण करण्यात आले मात्र पाऊस असल्याने श्वान घराबाहेर घुटमळले तर ठसे तज्ज्ञांना काही ठसे आणि अधिक पुरावे मिळाले आहेत.
बिळाशी येथील विनायक मारुती शिंदे फिर्याद दिली आहे त्या त्यांनी रोख रकमेसह सोने आणि चांदी असा ६६ हजारांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे म्हणले आहे तर शाहूपुरी शहाबुद्दीन मुलाणी यांनी आपल्या फिर्यादी मध्ये अठरा हजार रु चे दागिने आणि रोख रक्कम ६ हजार लंपास झाल्याचे म्हणले आहे अधिक तपस कोकरूड पोलीस करीत आहेत.