रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ सोलापूरचे नव्हे तर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ मधील नामांकित क्ल्ब आहे. क्लबची स्थापना सन १९७४ साली झाली. यावर्षी क्लब यशस्वी ५० वर्षे पूर्ण करीत आपल्या सुवर्णमहोत्सवात पदार्पण करत आहे. गेली ५० वर्षे अनेक जनसेवाभिमुख विविध कार्यक्रमाचे आयोजन सोलापूरातील दुर्लक्षित वर्गाकरिता क्लबने केले आहे. कामगार महिलांची रक्तक्षय तपासणी, सर्व रोग तपासणी शिबिरे, शाळांना ई-लर्निंग किटस्, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, हात धुण्याच्या जागृतीसाठी प्रबोधन, आर्थिक साक्षरता, कृत्रिम हात मोतिबिंदू चिकित्सा, पर्यावरण, शस्त्राक्रिया व भूकंपग्रस्त किल्लारी येथील रोटरीनगर सालेगाव निर्मितित भरघोस योगदान, क्लबतर्फे “लो कॉस्ट हौसिंग” या प्रकल्पा अंतर्गत रक्कम ७१ लाख रुपये खर्च करुन १७० घरांची निर्मिती, अनेक शाळा व कॉलेजसमध्ये चित्रफित आणि पोस्टरच्या माध्यमाने वाहतूक प्रबोधन, सिव्हिल हॉस्पिटल येथे चार हेमोडायलिसिस मशिन्सचे लोकापर्ण— असे अनेक कार्यक्रम क्लब आयोजित करीत आहे.
रोटरी विश्वातील सर्वोच्च सन्मान “सव्हिस अबोव्ह सेल्फ” क्लबचे दोन सदस्य पी.डी.जी.रो. कै. डॉ. अनिल गुंजोटीकर व रो. राजगोपाल झंवर यांना मिळाला आहे. क्लब व रोटरी जगताचा मानबिंदू असलेल्या राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालय व दमाणी अंधशाळा यांचे व्यवस्थापन क्लब करीत आहे. दोन्ही शाळांचा निकाल १००% असून राज्यस्तरीय खेळ स्पर्धामध्ये विद्यार्थ्यानी बक्षिसे पटकावली आहेत.
२०२३-२४ च्या अध्यक्षपदी रो. अॅड. मल्लिकार्जुन आष्टगी व सचिवपदी रो. डॉ. जानवी माखीजा असणार आहेत. यांचा पदग्रहण सोहळा दि. २० जुलै २०२३ रोजी हेंच फ्री मॅसॉनिक हॉल येथे होणार आहे. रो. मल्लिकार्जुन आष्टगी हे प्रथितयश विमा सल्लागार आणि विधिज्ञ आहेत. शिवाय तसेच शासकीय तंत्रनिकेतन, आयक्यूएसी दयानंद कॉलेज, सोलापूर महानगरपालिकाच्या सिटी टास्क फोर्सचे सभासद देखील आहेत. रो. डॉ. जानवी माखीजा या नॅचुरोथेरॅपिस्ट असून त्या सुमेध फाऊडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहे.
नूतन अध्यक्ष रो. मल्लिकार्जुन आष्टगी यांनी रोटरी वर्षात प्राथमिक शिक्षण, कृषी • आणि वैद्यकीय क्षेत्रात क्लबच्या माध्यमातून नवनवीन योजना राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी “अविरत” नावाची एक अभिनव संकल्पना देखील प्रत्यक्षात आणली आहे, ज्यात समाजातील दानशूरांकडून दररोज किमान १०००/- रु. देणगी ते गोळा करत आहेत आणि या दानाचा उपयोग समाजातील अनेक समस्या दूर करण्यासाठी होणार आहे. विशेष म्हणजे, या रोटरी वर्षात एकही दिवस खंड न पडता “अविरत” ही योजना सुरु राहणार आहे. पदग्रहणाच्या सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथीपदी पुणे येथील नामवंत डि.जी. ई. शितल शहा असणार आहेत. रोटरी विश्वात उत्कृष्टवक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे.
रोटरी क्लब सोलापूर नॉर्थचे असिस्टंट गव्हर्नर रो. जयेश पटेल देखील या कार्यक्रमात आमंत्रित आहेत. गेल्या वर्षी २०२२-२०२३ मध्ये क्लबने डिस्ट्रिक्ट ३१३२ मधून अध्यक्ष रो डॉ. निहार बुरटे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक उत्कृष्ट समाजपयोगी कार्य केले आहेत. अशा या नामवंत क्लबच्या पुढील वर्षाच्या उज्वल कारकिर्दीकरीता आपल्या शुभेच्छा व सहकार्य अपेक्षित आहे, तरी सर्व पत्रकार बंधूंना आपल्या दैनिकात या कार्यक्रमाची प्रसिध्दी द्यावी ही विनंती.