मोडनिंब : कांदा, मुळा, भाजी… अवघी विठाई माझी.. असे संतवाचन सांगणाऱ्या श्री. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पंढरपूरहुन निघालेली विठुरायाची पालखी मोठ्या भक्ती भावात अरण मध्ये पोहोचली.महामार्ग लगत असणाऱ्या उत्तम सावंत यांच्या कुटुंबियांच्या वतीने विठुरायाच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला.
महामार्गापासून संत सावता महाराज मंदिरापर्यंत परीट समाजाच्या वतीने सावता वाघमारे यांच्या कुटुंबियांच्या वतीने पालखी साठी पायघड्या घालण्यात आल्या.
रात्री बारा वाजल्या सुमारास देव आणि संत सावता महाराज यांची भेट झाली. शेकडो वर्षांची परंपरा असलेली विठुरायाची पालखी यंदाही सजवलेल्या पालखी रथातून आणण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून पंडित सुर्वे हे आपली बैल जोडी मोठ्या आनंदाने सेवा म्हणून पालखी साठी वापरतात.
सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सावता महाराज समाधी मंदिर विद्युत रोषणाईने सजवन्यात आले आहे.
अरणच्या सरपंच सुरत्न प्रभा ताकतोडे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे सचिव एडवोकेट विजय शिंदे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ. प. बाळासाहेब देहूकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशिगंधा माळी, तलाठी चव्हाण, संदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले.