सुधीर गोखले (येस न्युज मराठी प्रतिनिधी) : मिरजेतील ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट परिसरातील चौकात उभारण्यात आलेल्या आयलँड आणि श्री महालक्ष्मी मूर्तीच्या नूतनीकरणाचे उदघाटन काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडले पालकमंत्री ना डॉ सुरेश खाडे यांच्या हस्ते हे उदघाटन पार पडले. यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गेल्या बऱ्याच काळापासून हे आयलँड आणि श्री महालक्ष्मी मूर्ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत होती स्थायी समिती चे माजी सभापती आणि नगरसेवक निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा नूतनीकरण प्रकल्प पूर्णत्वास गेला. या उदघाटन प्रसंगी मंत्री खाडे यांनी प्रथम मिरज मार्केटमधील नवीन आयलँड व लक्ष्मीमुर्तीचे उद्घाटन करीत या प्रकल्पाचे संकल्पक माजी सभापती आणि नगरसेवक निरंजन आवटी व त्यांच्या परिवारास सदिच्छा दिल्या. या वास्तूच्या सुशोभीकरण यामुळे शहराच्या वैभवात मोलाची भर पडली त्यांनी सांगितले. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारी ही वास्तू शहराचे मुख्य आकर्षण ठरेल. आवटी परिवाराने अशा कामांच्या माध्यमातून आपले वेगळेपण जपले असून त्यांचे याबाबतीत कौतुक आहे. विकासकामांच्या बाबतीत नेहमीच त्यांना सहकार्य केले असून यापुढेही अशा वैविध्यपूर्ण कामांना निधीच कमतरता अजिबात भासू देणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी दिली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि आवटी परिवाराने मिरजेच्या विकासामध्ये मोठी भूमिका बजावली आहे.
मिरजेच्या विकासाला आवटी परिवाराने वाहून घेतले आहे त्यांच्या प्रभागामध्येच नाही तर मिरज शहरातील प्रमुख चौकातील सुशोभीकरणातही त्यांचा मोलाचा वाटा आहे यावेळी वसंतदादा सह साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सुरेश आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप शहराध्य्क्ष बाबासाहेब आळतेकर, युवा नेते सुशांत खाडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.