सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी ते दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने जनतेला पाच आश्वासनं दिली होती. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री होताच ती आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहेत. सरकार सत्तेवर येताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक बोलावून निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या पाच आश्वसनांना तत्वत: मान्यता दिली. म्हणजेच, निवडणूक प्रचार सुरु होण्यापूर्वी आचारसंहिता लागू होण्याआधी आणि जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी काँग्रेसने ज्या पाच आश्वासनांचा उल्लेख केला होता, त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जारी केले आहेत. या योजनांवर किती खर्च केला जाईल, याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. अंदाजानुसार, निवडणूक आश्वासनांची पूर्तता केल्याने सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी ५० हजार कोटी रुपये एवढा बोजा येईल. आमच्या सरकारला एका वर्षात 50 हजार कोटी रुपये उभे करणं अशक्य आहे, असं मला वाटत नाही असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हंटल आहे.