पंढरपूर- पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अपेक्षे प्रमाणे चळे येथील हरिष गायकवाड तर उपसभापतीपदी पुळूज येथील राजूबापू गावडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सदर निवडी अडीच वर्षासाठी करण्यात आल्या आहेत.
बाजार समितीवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांची एकहाती सत्ता आली असून गुरूवारी बाजार समितीच्या कर्मयोगी सभागृहात सभापती व उपसभापती पदाच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी गायकवाड व गावडे यांचे अनुक्रमे सभापती व उपसभातीपदासाठी एक एक अर्ज दाखल झाल्याने सदर निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडी नंतर युटोपियन शुगर्सचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.
मेश परिचारक यांनी यावेळी बोलताना केवळ विरोधासाठी बाजार समितीची निवडणूक लावण्यात आली. मात्र मतदारांनी पांडुरंग परिवारावर विश्वास टाकला. आपल्या विरोधात काम करणार्या काही गटांनी देखील या निवडणुकीत आपणास मदत केली असून त्यांचे देखील आभार व्यक्त करीत असल्याचे परिचारक यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती दिलीप घाडगे, माजी उपसभापती विवेक कचरे, जेष्ठ नेते वामनराव माने, सुभाष माने, बाळासाहेब देशमुख, दिलीप चव्हाण, भैय्या देशमुख, तानाजी वाघमोडे, लक्ष्मण धनवडे, सोमनाथ डोंबे, संतोष घोडके, सुभाष मस्के आदी उपस्थित होते.