प्रमोद साठे यांच्या स्पॅनिश थीमची देशपातळीवर दखल
सोलापूर : स्पेन इन सोलापूर या थीमवर आधारित साकारत असलेल्या व्यंकटेश ला-आर्का या प्रोजेक्टला देशपातळीवरील बेस्ट रियल इस्टेट पुरस्कार मुंबई येथे एका विशेष समारंभात पद्मश्री, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देश आणि परदेशातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा//ऱ्या 50 जणांना ब्रँड एमपॉवर या नवी दिल्ली येथील संस्थेच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला.पद्मश्री, अभिनेत्री माधुरी दीक्षित, संस्थेचे प्रमुख राहुल रंजनसिंग यांच्या हस्ते व्यंकटेश ला-आर्काचे चेअरमन प्रमोद साठे आणि कार्यकारी संचालक आकाश साठे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विजापूर रस्त्यावर निसर्गाच्या सान्निध्यात हा प्रकल्प साकारत आहे.प्रमोद साठे यांनी आतापर्यंत विविध देशांचा अभ्यास दौरा करून अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करून सोलापुरात प्रथमच स्पॅनिश थीम राबवून हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाची देशपातळीवर दखल घेतल्याने व्यंकटेश ला-आर्काच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. साठे यांच्या या प्रकल्पाचे अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि संस्थेचे प्रमुख राहुल रंजनसिंग यांनी भरभरून कौतुक करतानाच अशा प्रकारचे प्रकल्प देशातील विविध शहरांमध्ये साकारले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भरभरून प्रतिसाद
सोलापूर शहरात प्रथमच स्पेन इन सोलापूर या थीमवर आधारित प्रकल्प सुरू केला. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. स्पॅनिश थीमची दखल देशात पहिल्या तीन संस्थांमध्ये असलेल्या दिल्लीच्या ब्रँड एमपॉवर या संस्थेने घेतली, हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असून यापुढील काळातही अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग करण्याचा आपला प्रयत्न राहील.
– प्रमोद साठे, चेअरमन-व्यंकटेश ला-आर्का प्रकल्प