सोलापूर – आज दिनांक ११/०५/२०२३रोजी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम,जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय , सोलापूर यांच्यावतीने स्वस्थ तन स्वस्थ मन या मोहिमअंतर्गत मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी. के . पाटील सर,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृह सोलापूर येथे बंदी पुरुष व महिला साठी मानसिक आरोग्य जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सुरवातीला, कारागृह अधीक्षक श्री हरीभाऊ मिंड यांनी कार्यक्रमाची माहिती दिली व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. पुढे मानसोपचार तज्ञ डॉ हर्षल थडसरे यांनी मानसिक आजार म्हणजे काय ? ते कसे ओळखावे ? त्याची लक्षणे , उपचार यासोबतच मानसिक आजाराविषयीचे गैरसमज याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले . आत्महत्या, त्याची कारणे व प्रतिबंध शिवाय व्यसन म्हणजे मानसिक आजार याविषयी विस्तृत चर्चा केली. कार्यक्रमानंतर उपस्थित बंदी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ताणतणावाचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. शेवटी बंदी पैकी जवळपास २० लोकांना वैयक्तिक समुपदेशन व औषधोपचार केले गेले.
याशिवाय सर्व पुरुष व महिला बंदी यांचेमध्ये क्षय रोग विषयक लक्षणे यांची माहिती देवून, आजारविषयक गैरसमज, निदान व उपचार सुविधा व मानसिक स्वास्थ्य कायम राखणे विषय आदि बाबीची सखोल चर्चा करणेत आली. या प्रसंगी कारागृहाचे अधीक्षक हरीभाऊ मिंड सर, बाबर व इतर कारागृह कर्मचारी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन अतुल राऊत यांनी केले.