• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कृषी विभाग राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
May 8, 2023
in इतर घडामोडी
0
कृषी विभाग राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धेचा निकाल जाहीर
0
SHARES
0
VIEWS

कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले विजेत्या शेतकऱ्यांचे अभिनंदन

पुणे – राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यात पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. त्यानुसार सन २०२२ मध्ये खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी,मका,नाचणी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पीकस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

बक्षीसाचे स्वरुप प्रथम क्रमांक ५० हजार, द्वितीय ४० हजार तर तृतीय क्रमांक ३० हजार रुपये असे आहे.

विविध गटातील प्रथम विजेते
या राज्यस्तरीय खरीप पीकस्पर्धेत भात सर्वसाधारण गटामध्ये चांदखेड, जि. पुणे येथील शेतकरी नितीन चंद्रकांत गायकवाड यांनी राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. मराठवाड्यातील महिला शेतकरी श्रीमती जयश्री भीमराव डोणगापुरे यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चार पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर बोरपाडळे (कोल्हापूर) येथील बाजीराव सखाराम खामकर यांनी सोयाबीन सर्वसाधारण गटात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.

बाजरी पिकात सांगली जिल्ह्यातील विठ्ठल ईश्वर सावंत यांनी तर नाचणी पिकात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवलिंग कल्लाप्पा गावडे, मूग पिकासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सुभाष बाजीराव कर्डिले, उडीद पिकासाठी दिपक तुकाराम ढगे तसेच भूईमुग पिकासाठी कृष्णा भाऊ चौगुले व सुर्यफूल पिकाच्या उत्पादन वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सोपान कृष्णा कारंडे हे प्रथम क्रमांक विजेते ठरले आहेत. हरपळवाडी (सातारा) येथील शेतकरी प्रल्हा्द नारायण काळभोर यांनी ज्वारी पिकात तर अग्रण धुळगावचे (सांगली) संभाजी तातोबा खंडागळे यांनी मका पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सात पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. नांदेडच्या श्रीमती वनिता श्रीराम फोले यांनी सोयाबीन आदिवासी गटात विक्रमी उत्पादन मिळवून प्रथम मिळविला आहे.

द्वितीय व तृतीय विजेते
भात पीकस्पर्धेत सर्वसाधारण गटात कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात गोपाळ खाडे व बाबूराव आप्पाजी परीट तर आदिवासी गटात पुणे जिल्ह्यातील मुरलीधर सखराम कवठे व शांताराम तुकाराम बोकड.

खरीप ज्वारी सर्वसाधारण गटात जळगाव जिल्ह्यातील ज्ञानेश्वर चिंतामण पाटील व अर्जून दामू पाटील तर आदिवासी गटात धुळे जिल्ह्यातील बिलाडया चमाऱ्या पावरा व श्रीमती सुकमाबाई खुमसिंग पावरा

खरीप बाजरी सर्वसाधारण गटात सांगली जिल्ह्यातील विठ्ठल बापू चोपडे आणि नामदेव चनबसू माळी, तर आदिवासी गटात धुळे जिल्ह्यातील जगदीश हारु पावरा व वामन लालसिंग पावरा .

मका सर्वसाधारण गटात सुमंत तुळशराम पवार आणि भिमराव राजाराम खर्चे, तर आदिवासी गटात गंगराम वेस्ता पावरा आणि रणजित गणा पावरा

नाचणी सर्वसाधारण गटात कोल्हापूर जिल्ह्यातील बाळू लक्ष्मण भडगावकर व विष्णू धोंडिबा गावडे, तर आदिवासी गटात ठाणे जिल्ह्यातील मुसईवाडी येथील जानु ओको कामडी व पद्माकर महादु वाख

तूर सर्वसाधारण गटात अहमदनगर जिल्ह्यातील विक्रम पंढरीनाथ अकोलकर व श्रीमती बाई बुवासाहेब शिंदे, तर आदिवासी गटात दिलीप चामट्या भिल .

मूग सर्वसाधारण गटात अहमदनगर जिल्ह्यातील गोरख हरीभाऊ जाधव, धोंडीभाऊ मारुती जरे, तर आदिवासी गटात श्रीमती शांताबाई पंडित चौधरी व प्रकाश हेमकांत बंकाळ.

उडीद पीकासाठी सर्वसाधारण गटात नितीन सुर्यकांत शेटे आणि भागचंद्र शाहूराव उगले, तर आदिवासी गटात सखाराम कैस गावित.

सोयाबीन पिकासाठी सर्वसाधारण गटात राजाराम योगाजी शिंदे व रमेश विलास जाधव, तर आदिवासी गटात नारायण मल्हारी तुगार व श्रीमती रेखा रमेश कुमरे.

भुईमुग सर्वसाधारण गटात रामचंद्र विठू कोरे आणि श्रीमती सावित्रीबाई रामचंद्र पाटील. सुर्यफूल सर्वसाधारण गटात विश्वनाथ भिमराव पाटील व भारत लक्ष्मण मुंगसे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे.

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
पीकस्पर्धेत सहभाग घेण्यासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटास पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रु. ३०० प्रवेश शुल्क आहे. यापुढील स्पर्धेसाठीही इच्छुक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा,असे आवाहन कृषि आयुक्त चव्हाण यांनी केले आहे.

Previous Post

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

Next Post

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

Related Posts

आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी
इतर घडामोडी

आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी

July 14, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
Next Post
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी

आषाढी यात्रा 2026 : वारकरी भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर समितीची जय्यत तयारी

July 14, 2026
TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!

TOP 25 । सोलापूरच्या तिघांचे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी कनेक्शन…!

July 14, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

सोलापूर पुणे महामार्गावर बाळे येथील फोर्स शोरूमजवळ ट्रकची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक, एक ट्रकचालक गंभीर जखमीं

July 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026