सोलापूर : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, सोलापूर आणि एम.आय.टी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग,बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये 15 उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे 151 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.
या मेळाव्यात औद्योगिक परिसरातील 15 नामांकित उद्योजकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्याकडून एकूण 2 हजार 600 पेक्षा जास्त रिक्तपद कळविण्यात आलेली होती. ही सर्व रिक्तपदे किमान 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बी.एसी, एम.एसी, बँकींग, मशिन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, बी.फार्म, एम.फार्म, नर्सिंग, पॅरामेडीकल, लॅब टेक्टीशियन, मॅकॅनिकल अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी होती.
जिल्हयातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. सदर रोजगार मेळाव्यात 437 नोकरीइच्छुक उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामधून एकूण 9 उद्योजकांमार्फत प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे 151 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त श्री जाधव यांनी सांगितले.