देशात कोरोना प्रादुर्भावाचा वेग अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत देशात कोरोना व्हायरसच्या 5 हजार 880 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 35 हजार 199 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दिवसागणिक देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या (Covid-19) आकड्यातही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
उन्हाळा सुरू होताच पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. भारतातील काही राज्यांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे सामान्य नागरिक आणि प्रशासन दोघांचीही चिंता वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये मास्क घालण्यास सुरुवात झाली आहे. तर देशातील काही सार्वजनिक ठिकाणी सरकारने मास्क घालणे अनिवार्य केले आहे. काही राज्यांमध्ये आरोग्य विभागाकडून कोरोना टाळण्यासाठी आणि बूस्टर डोस घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘या’ राज्यांत कोरोनाची परिस्थिती चिंताजनक
केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात सारख्या इतर राज्यांमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाची 1 हजार 799 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात 788 तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 755 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत कोरोनाला रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात आणि लसीचा बूस्टर डोस घ्यावा, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात कोरोनाचा आलेख सातत्याने वाढताना दिसून येतोय. सर्व राज्ये आपापल्या स्तरावर साथीच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी तयारी करत आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सोमवार आणि मंगळवारी देशव्यापी मॉक ड्रील आयोजित करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
कोरोनाशी लढण्यासाठी मॉकड्रील
कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभरात मॉकड्रील केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींच्या तयारीची चाचणी होणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही? याची खात्री केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया मॉकड्रिलची पाहणी करण्यासाठी झज्जरच्या एम्स रूग्णालयात उपस्थित राहणार आहेत. तर मुंबईत आज सकाळी 11 वाजता जे. जे. रुग्णालयात, दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील होणार आहे.