सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ नियोजित शंभर एकर प्रस्तावित भव्य गारमेंट पार्क चर्चासत्रास दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
एमआयडीसी परिसरात लक्ष्मीनारायण थिएटर समोर असलेल्या रेडिमेड कापड उत्पादक संघाच्या भव्य हॉलमध्ये ही बैठक संपन्न झाली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा, सेक्रेटरी प्रकाश पवार , उपाध्यक्ष सतीश पवार, खजिनदार श्रीकांत अंबुरे, सुनील मेंगची यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाले.
सोलापूर शहर व परिसरातील गारमेंट उद्योजकांची गरज ओळखून एक गारमेंट पार्क उभारणे आवश्यक आहे. तसेच एकाच असल्याने प्रत्येक अडचणीवर मात करणे सोपे होईल त्यासाठी शासनाने जे जे मदत करायला हवे त्या सर्व तरतुदीं करिता मी सहकार्य करायला तयार आहे असे आश्वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिले. या बैठकीस जवळजवळ 200 गारमेंट उद्योजक उपस्थित होते जेणेकरून गारमेंट पार्क यशस्वी व्हावे असाच उद्देश या उद्योजकांच्या मनात दिसत होता जर गारमेंट पार्क यशस्वी झाले तर प्रत्येक उद्योजकांना विक्रीवर पाच टक्के अनुदान किंवा अशा विविध सुविधा शासनाकडून मिळतील अशी माहिती अमित जैन यांनी दिली.
सोलापूरचे वैभव पुन्हा उभ करायचं असेल तर गारमेंट पार्क उभारणे गरजेचे आहे. या वेळी सर्वच उद्योजकांनी सकारात्मकता दर्शवली. या केलेकार्यक्रमाची प्रस्तावना सचिव प्रकाश पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहसचिव सुनील मेंगजी यांनी मानले कार्यक्रमास एमआयडीसीतील गारमेंट उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.