सोलापूर – सोलापूर शहरातील थकीत मिळकत करासंदर्भात मा.आयुक्त यांनी कर विभागास 180 कोटीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दिले होते. त्यानुसार महापालिकेचे मालमत्ता कर विभागाने 181 कोटी कर वसुली करून कर वसुलीचा नवा उच्चांक गाठला आहे. महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले व उपायुक्त तथा करसंकलन विभाग प्रमुख विद्या पोळ यांनी कर संकलन अधिकारी, कर वसुली अधिकारी,तसेच मालमत्ता कर विभागाचे सर्वांचे अभिनंदन केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या कर वसुली संदर्भात विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना पाच टक्के सूट रॅबिट इतर बाबींची सूट नागरिकांना देण्यात आल्या होत्या. जेणेकरून नागरिकांना याचा लाभ जास्तीत जास्त व्हावा यासाठी कर विभागाने सुरुवातीपासूनच नियोजन केले होते. अभय योजनेच्या कालावधीमध्ये सोलापूर शहरातील शैक्षणिक संस्था, उद्योजक, शासकीय कार्यालय लक्ष करत जानेवारी महिन्यात 135 कोटी कर वसुलीचा टप्पा गाठण्यात आला होता. त्यानंतर कर वसुली संदर्भात मा. आयुक्त यांनी यापुढे अभय योजना दिले जाणार नाही असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर शहरातील थकीत मिळकत करापोटी घरगुती, व्यवसायिक संस्था, उद्योजक, झोपडपट्टी परिसर,शासकीय कार्यालय अशा सर्वच घटकांवर,जप्ती व कारवाई मोठ्या प्रमाणात घेण्यात आले.50 हजार वरील थकबाकी असलेले सर्व क्षेत्रातील मिळकतीवर कारवाई करण्यात आली. तीन लाखाचे थकबाकीदार यांना कर विभागाच्या कडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यावरील कारवाईसाठी फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात मुख्य कार्यालयाचे दोन प्रत्येक झोननिहाय एक पथक असे एकूण दहा पथक कर वसुलीसाठी कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे 181 कोटीचा करवसुलीचा उद्दिष्ट गाठणे शक्य झाले असे उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले. आतापर्यंत 95 मालमत्ता कर विभागाने सील केले आहे. त्याचबरोबर 192 मिळकतदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावेळी प्रथमच गवसू विभागाच्या वतीने जप्तीची कारवाई केल्याने गवसू विभागाची वसुली मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने यापुढेही कर कर संकलन विभागाकडून करवसुली अशाच प्रकारे सुरू राहणार असून मिळकत करावरील कारवाई टाळण्यासाठी सर्व सोलापुरातील नागरिकांनी आपले मिळकत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.
मागील पाच वर्षाचे आकडेवारी
सन -2017-18 -117 कोटी 64 लाख
सन -2018-19 – 108 कोटी 78 लाख
सन -2019-20 – 139 कोटी 93 लाख
सन -2020-21 – 109 कोटी 92 लाख
सन -2021-22 – 136 कोटी 44 लाख
सन -2022-23 – 181 कोटी