• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सांगलीत जल्लोषात रामनवमी, मध्यरात्री मुस्लिम कार्यकर्त्यांकडून साफसफाई!

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2023
in मुख्य बातमी
0
सांगलीत जल्लोषात रामनवमी, मध्यरात्री मुस्लिम कार्यकर्त्यांकडून साफसफाई!
0
SHARES
0
VIEWS

रामनवमी साजरी होत असताना राम भक्तांकडून झालेल्या कचऱ्याची साफसफाई मुस्लीम कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे रामनवमीच्या निमित्ताने सांगलीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडून आले.
सांगलीमध्ये गुरुवारी रात्री उशिरापर्यंत राम भक्तांकडून जल्लोषात रामनवमी साजरी करण्यात आली. यानंतर मध्यरात्री मुस्लिम कार्यकर्त्यांकडून रामनवमी साजरी होत असताना राम भक्तांकडून झालेल्या कचऱ्याची साफसफाई मुस्लीम कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे रामनवमीच्या निमित्ताने सांगलीत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडून आले. सांगलीच्या राम मंदिर चौकात गुरुवारी रात्री साथीदार युथ फौंडेशनच्या वतीने रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
अगदी उशिरापर्यंत रामनवमीचा जल्लोष रंगला. मध्यरात्रीस गर्दी संपली, आणि मागे रस्त्यावर ढिगभर कचरा झाला होता. तो पाहून रमजानच्या तराबीनंतर घरी परतणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे हात सफाईसाठी सरसावले. पहाटे दोनपर्यंत अवघा चौक टकाटक करुन सोडला. गुरुवारी दिवसभर साथीदार फौंडेशन आणि राम मंदिर चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे भक्तीपूर्ण वातावरणात रामजन्मोत्सव साजरा झाला.
हजारो भाविकांनी रांगा लावून श्रीरामाचे दर्शन घेतले. सायंकाळी मुख्य कार्यक्रम उशिरापर्यंत रंगला. मध्यरात्री संपला, तेव्हा चौकात सर्वत्र कचरा पसरला होता. भाविकांनी व कार्यकर्त्यांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, कागदाचे रंगीबेरंगी कपटे, उधळलेली फुले अशा कचऱ्यामुळे रस्ता माखून गेला होता. महापालिकेचे सफाई पहाटे साफसफाई करणार होते, पण तत्पूर्वीच त्या रोडवरून जाणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांना चौकातील कचरा दिसला.
रामभक्तांनी मुस्लिम कार्यकर्त्यांचे मानले आभार
यावेळी इन्साफ फौंडेशनच्या मुस्तफा मुजावर यांच्यासह अन्य काही जणांनी काही वेळात त्या ठिकाणी स्वच्छता सुरु केली. मदतीला सावली बेघर केंद्रातील रहिवासी आणि इन्साफ फौडेशनच्या कार्यकर्त्यांना मदतीला घेतले. मध्यरात्री बारापासून पहाटे सफाईनंतर चौकात कचऱ्याचा एकही कपटाही उरला नाही. गोळा केलेला कचरा सकाळी महापालिकेच्या गाडीतून डेपोवर गेला. रामनवमीच्या जल्लोषानंतर झालेला कचरा मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकत्र येत गोळा केल्याने साथीदार ग्रुपच्या सदस्यांनी आणि रामभक्तांनी देखील या मुस्लिम कार्यकर्त्यांचे आभार मानले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन गटात तणाव
दुसरीकडे, रावनवमीच्या उत्साहाला गालबोट लागणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री शहरात दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तर या प्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हाही दाखल केला होता. दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी मोठं पाऊल उचललं असून, शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे. किराडपुरा भागात झालेल्या या राड्याची एसआयटी पथकाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार हे या पथकाचे प्रमुख असणार आहे.

Previous Post

दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करा; कोविड टास्क फोर्सची सूचना

Next Post

मविआच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार : संजय शिरसाट

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
मविआच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार : संजय शिरसाट

मविआच्या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार : संजय शिरसाट

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026