No Result
View All Result
- ठाणे : करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. वैभव कदम हे तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाडांचे अंगरक्षक असताना ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या बंगल्यात नेऊन बेदम मारहाण केल्या प्रकरणात ते आरोपी होते.
- भावनिक संदेशाचे स्टेटस : वैभव कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर भावनिक संदेशाचे स्टेटस ठेवले. कोणीही अश्रू पाहत नाही, कोणी दुःख पाहत नाही, कोणीही त्रास पाहत नाही, सगळे चुका शोधतात अशा आशयाचे स्टेटस त्यांनी ठेवले होते. यासोबत मला आरोपी म्हणू नका, अशी विनंती ही वैभव कदम यांनी सोशल मीडियावर केली होती. तसेच पोलिसांनी आणि मिडीयाला मी आरोपी नाही, असे देखील त्यांनी नमूद केले.
- करमुसे प्रकरणात आरोपी : करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणात कदम यांच्यासह सागर मोरे आणि सुरेश जनाटे या पोलिसांनाही अटक झाली होती. जामीन मिळाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. वैभव कदम यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
- सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी तपासानंतर वैभव कदम यांना अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती. दरम्यान अनंत करमुसे यांनी मारहाण प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या मारहाण प्रकरणात जवाब पुन्हा नोंदविले जाणार होते. मागील अनेक दिवसांपासून विभागीय चौकशीमुळे कदम यांच्यावर मोठा दबाव होता. एकीकडे नोकरीचा मानसिक त्रास आणि न्यायालयात प्रकरण या बाबी त्रासदायक ठरल्यामुळे त्यांनी आत्माहत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- सीसीटिव्ही फुटेज ठरले अडचणीचे : अनंत करमुसे यांनी याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. ते राहत असलेल्या इमारतीच्या लिफ्ट आणि इतर परिसराचे सीसीटिव्ही फुटेज हे अपहरण झाल्याचे पुरावे म्हणून दिले होते. त्यात वैभव कदम हे दिसत होते. यावरून भविष्यात होणाऱ्या अडचणींचा अंदाज कदम यांना आला होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते तणावाखाली होते.
No Result
View All Result