• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, July 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या लोहा येथील सभेत एक लाख क्षमतेचा मंडप अन् १०० कुलर

by Yes News Marathi
March 26, 2023
in इतर घडामोडी
0
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या लोहा येथील सभेत एक लाख क्षमतेचा मंडप अन् १०० कुलर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये ५ फेब्रुवारीला संवाद मेळावा घेतला होता. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने आपल्या पक्षाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरुवात केलेली आहे. भारत राष्ट्र समितीकडून सीमावर्ती भागातील गावांमध्ये भेटीगाठीचे सत्र अनेक महिन्यांपासून आपण पाहत आहोत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी देशभर आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आज लोहा येथे भारत राष्ट्र समितीची दुसरी जाहीर सभा होणार आहे.
  • या सभेसाठी लोहा शहर पूर्णतः गुलाबी व झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात सर्वत्र बॅनर व पताके लावून होल्डिंग लावण्यात आले. त्यातच भव्य दिव्य असा टेन्ट व पार्किंगची व्यवस्था बैल बाजार येथे करण्यात आली. या सभेसाठी 1 लाख नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. हेलिपॅड शहरालगत बनवण्यात आले आहे. त्यात 24 तासापासून सुरक्षा पोलीस कर्मचारी तैनात आहेत. लोहा शहरात प्रचंड सुरक्षित वाढ करण्यात आली आहे.
  • मागील दहा दिवसापासून बीआरएस पार्टीतर्फे जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. त्यात शंभरहून अधिक चित्ररथांचा उपयोग करून गावोगावी प्रचार प्रसार करण्यात येत आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या सभेसाठी भव्य दिव्य सभा मंडप उभारण्यात आला. ऊन, पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आला आहे. तसेच उष्णता वाढू नये, यासाठी शंभरहून अधिक एअर कुलर लावण्यात आले आहे. नागरिकांसाठी सभेचे थेट प्रदर्शन व्हावे, म्हणून मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • भारत राष्ट्र समितीची नांदेडमध्ये पहिली जाहीर सभा झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण बदलण्यास सुरुवात झाली. यातच अनेक नेते हे भारत राष्ट्र समितीच्या संपर्कात आले. अनेक नाराज नेते यांच्या गाठीभेटी बिआरएसच्या वतीने घेण्यात आल्या आहेत. आज अजून कितीजण प्रवेश करतील हे पहावे लागेल. बीआरएसच्या महाराष्ट्रातील प्रवेशामुळे भाजप-सेनेला कमी तर काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मतपेटीला चांगलेच भगदाड पडू शकते, असे सध्यातरी दिसून येते.
  • महाराष्ट्राला लागूनच तेलंगणाची सीमा आहे. या सीमेला लागूनच भोकर, धर्माबाद, बिलोली, देगलूर,मुखेड,नायगाव, देगलूर, मुखेड, नायगाव, उमरी आदी तालुके आहेत. या तालुक्यातील अनेकांचे नातेसंबंध तेलंगणात आहेत. तेथील सरकारने लग्नासाठी मदत, घर बांधकामासाठी मदत, धनगर बांधवांसाठी शेळ्या-मेंढ्याची योजना, महिलांसाठींच्या योजना, शैक्षणिक सवलती अशा अनेक सोयी सवलती मिळवून दिल्या आहेत. या सोयी सवलती महाराष्ट्रातील अनेकजण जवळून पहात आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य जनतेलाही हा पक्ष जवळचा वाटल्यास नवल वाटू नये. आजच्या कार्यक्रमानंतर चित्र अधिक स्पष्ट दिसू लागेल.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात काढणार ‘धनुष्यबाण यात्रा’; छ. संभाजीनगरमधून सुरुवात

Next Post

चुलीवरील बाबांचे पितळ उघडे पडताच बाबाने गावातून ठोकली धूम

Next Post
चुलीवरील बाबांचे पितळ उघडे पडताच बाबाने गावातून ठोकली धूम

चुलीवरील बाबांचे पितळ उघडे पडताच बाबाने गावातून ठोकली धूम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group