• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2023
in मुख्य बातमी
0
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
0
SHARES
1
VIEWS
  • मुंबई – राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, राज्यभरात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे.
  • शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीनं महसूल यंत्रणेनं लगेच कामाला लागावं आणि पंचनामे करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे.
  • मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
  • राज्यात अवकाळी पावसाची हजेरी
    हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यातच ठाणे, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. ठाण्यात होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पावसानं बरसायला सुरुवात केली. तर कल्याण, डोंबिवली, भिवंडीतही पावसानं दिवसभर हजेरी लावली. दुसरीकडे जळगावमध्ये अवकाळी पावसानं आणि धुळे जिल्ह्यात गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे.
  • कल्याण डोंबिवलीत मध्यरात्री रिमझिम पाऊस
    हवामान खात्याकडून येत्या काही महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात गुरुवारी (7 मार्च) काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी चारनंतर अचानक सोसाट्याच्या वारा सुटला होता. वाऱ्यासोबत धूळही हवेत उडाल्याने कल्याण डोंबिवलीत धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं तर मध्य रात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
  • पालघर जिल्ह्यात वीज पडून आग लागल्याच्या घटना
    पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आजही ढगाळ वातावरण आहे. तर रात्री वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी बरसल्या असून आंबा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर या अवकाळी पावसाचा फटका बागायती शेतीबरोबरच रब्बी पीक वीट भट्टी व्यवसायिक आणि गवत पावली व्यवसायालाही बसला आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी उंच झाडांवर आकाशी वीज पडून आग लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. वडराईमध्ये नारळाच्या झाडावर तर वेति मध्ये ताडाच्या झाडावर आकाशी वीज पडून आग लागली.
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी धारिष्ट्य आणि मुत्सद्दीने लोककल्याणकारी आदर्श राज्यकारभार केले: डॉ. केळे

Next Post

अभिनेत्री सारा अली खानने तिचे लेटेस्ट ट्रेंडिंग फोटोशूट शेअर केले आहे

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
अभिनेत्री सारा अली खानने तिचे लेटेस्ट ट्रेंडिंग फोटोशूट शेअर केले आहे

अभिनेत्री सारा अली खानने तिचे लेटेस्ट ट्रेंडिंग फोटोशूट शेअर केले आहे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026