No Result
View All Result
- सोलापूर: राज्यसेवा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याची क्रेझ जिल्ह्यातील तरुणाईमध्ये वाढल्याचे चित्र असून, नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालात काही सोलापूरचे विद्यार्थिनी व विद्यार्थी परीक्षेत चमकले आहेत. यामध्ये अधिकारी वर्ग १ पदी निवड होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा डंका वाजला आहे.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील देवडी येथील शेतकऱ्याची मुलगी कु. सुरेखा सौदागर कांबळे हिने यश संपादन केले आहे. एसी प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यातून महिलांमध्ये ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आली आहे.
याच्या अगोदर सुरेखा कांबळे हिची २०२० च्या राज्यसेवा परीक्षेमध्ये नायब तहसीलदार पदी निवड करण्यात आली होती; आता त्यांची शासनाने पोलीस उपाधीक्षकपदी निवड केली आहे. ये यशाबद्दल समाजातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
- माझ्या या यशात माझे आई-वडील भाऊ -बहिण व मैत्रिणींचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच हे शक्य झाले आहे असे सुरेखा कांबळे हिने बोलताना सांगितले.
No Result
View All Result