No Result
View All Result
- छत्रपती संभाजी नगर – नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. मात्र याचवेळी या उपोषणास्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. उपोषण सुरू असतानाच काही तरुण हातात औरंगजेबाचे होर्डिंग घेऊन उपोषणास्थळी दाखल झाले. ‘जिंदाबाद जिंदाबाद, औरंगाबाद जिंदाबाद’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दरम्यान या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
- औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला आहे. तर याच निर्णयाच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मात्र याच साखळी उपोषणात काही तरुणांनी चक्क औरंगजेबाचे फोटो घेऊन जल्लोष साजरा केला. या सर्व घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, कोणीतरी आंदोलन खराब करण्यासाठी काही लोकांना फोटो घेऊन पाठवलं, पण आम्ही त्यांना बाहेर काढलं आहे.
No Result
View All Result