सोलापूर येथील दुर्लभ सुंन्द्रीवाद्या कला अकादेमी सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार केंद्रीय संगीत नाटक अकादेमी मल्हार डिजीटल रामेश्वर गुरव गितांजली पेन्ट कंपनी व हॉटेल ऐश्वर्या यांच्या संयुक्त विद्यमाने 4 व 5 मार्च रोजी संगीत प्रतिभा महोत्सव, बालगंधर्व संगीत महोत्सव आयोजन करण्यात आलेल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पंडित भिमण्णा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार 4 मार्च 2023 रोजी सांयकाळी 5.30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्पी थिएटर) येथे मा. शितल तेली-उगले मॅडम आयुक्त- सोलापूर महानगरपालिका व डॉ. राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर, नंदु भराडीया, शशिकांत पाटील, विजयदादा साळुंके, प्रशांत बडवे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. शाश्वती चव्हाण, के. रोहन नायडू, प्रितमदास अमिरखान, कृष्णेद्र वाडीकर, युवराज सोनार, सतेज करदीकर यांना युवा गंधर्व पुरस्कार प्रदान केला जाईल. प्रत्येकी 11000/- रुपये सन्मान चिन्ह, शाल,श्रीफळ असे पुरस्कार स्वरुप आहे.
यावेळी महोत्सवाची सुरुवात पाचव्या पिढीचे बाल कलाकार मास्टर व्यंकटेशकुमार जाधव मास्टर सिद्राम जाधव, कलाश्री जाधव, शंकुतला जाधव यांचे सामुहिक सुंन्द्रीवादन यांना नितीन दिवाकर तबल्याची साथ करतील. तसेच यावेळी पुण्याचे शाश्वती चव्हाण यांचे शास्त्रीय गायन यांना नितीन दिवाकर तबला व ओंकार पाठक संवादिनीची साथ करतील. छत्तीसगडहून आलेले के. रोहन नायडू वायोलीन वादन गणेश तानवडे तबल्याची संगत करतील. दिल्लीहून आलेले प्रितमदास याचे भरतनाट्यम नृत्य सादर होईल.
रविवार 5 मार्च 2023 सकाळी 9.30 वाजता सोलापूरच्या गानकौस्तुभ कनिष्का शिवपुजे याचे शास्त्रीय गायन नितीन दिवाकर तबला ओंकार पाठक याचे संवादिनी साथ भोपाळचे अमिरखान यांचे सरोद वादन यांना पंडित उदय मोजुमदार तबला साथ करतील. मुंबईचे युवा प्रतिभा बासरीवादक युवराज सोनार सतेज करंदीकर यांचे बासरी जुगलबंदी होणार अभिषेक भोसले तबला साथ करतील. किराणा घरण्याचे युवा प्रतिभा गायक कृष्णेंद्र वाडिकर यांचे शास्त्रीय गायन अविनाश पाटील तबला संगत तर ओंकार पाठक संवादिनी साथ करतील. जगदीश पाटील या संपुर्ण संगीत महोत्सवाचे सुत्रसंचालन करतील या दोन्ही दिवसाचे कार्यक्रम हिराचंद नेमचंद वाचनालय लोकमान्य टिळक अॅम्पी थिएटर येथे होत असून हा महोत्सव सर्वासाठी खुले व मोफत आहे.
तरी कला रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन पंडित भिमण्णा जाधव यांनी केले. पत्रकार परिषदेस संस्थेचे पदाधिकारी राजाराम जाधव, जगदीश पाटील, नितीन दिवाकर, लक्ष्मण जाधव, विश्वनाथ जाधव उपस्थित होते.