येस न्युज मराठी नेटवर्क ; उज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी वाटचालीसाठी रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयातील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दमाणी परिवार आणि शाळेकडून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यात आले. संस्थेचे विश्वस्त राजेश दमाणी सौ. प्रिया दमाणी आणि त्यांचा मित्रपरिवार या प्रसंगी उपस्थित होता. दहावीच्या आजपर्यंतच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित ठेवावी अशी भावना या प्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे अध्यक्ष डॉ निहार बुरटे यांनी राजेशजी दमाणी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर प्रिया दमाणी यांचा सत्कार धनश्री केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अतिथींचा सत्कार शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केला.
उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केले. तसेच दमाणी परिवाराकडून शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमास, अध्यक्ष डॉ निहार बुरटे, शाळेचे सचिव सुनील दावडा, धनश्री केळकर, देविदास मेढे, संजय चौगुले, कु पसपुले, सौ चंदनशिवे, कु पिटाळकर, पारेकर, चिंचोळे, सातपुते, बागवान, बेनुरे, ठाकर, बसाटे, ताठे, मदभावी, पाटील, थोरात, पवार ,आणि पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार सचिव सुनील दावडा यांनी मानले.