सोलापूर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित दादा तांबे यांनी आज शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी नीळ, उपजिल्हाप्रमुख राजकुमार शिंदे, उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे, कॉलेज कक्ष प्रमुख सुजित खुर्द, शशी शिंदे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.