भारताच्या प्रथम माजी महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह रणसिंह शेखावत यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पुण्यातील के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजारामुळं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
देवीसिंह रणसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आहेत. त्यांनी यापूर्वी अमरावतीचे माजी महापौर म्हणूनही काम केले होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य देखील होते. त्यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. देवीसिंह पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आल्यानं पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.