सोलापूर – सोलापूर महानगरपालिका अंतर्गत मा केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वा्यु (NCAP) उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणेत येत असुन त्याअनुषंगाने शहर स्तरावरील धुळीचे प्रदूषण (PM10, PM2.5) कमी करणे करिता पर्यावरण विभाग व महापालिकेचे वतीने कृती आराखडा तयार करणेत आला असुन सदर कृतीआराखड्याच्या अंमलबजावणी करिता मा केंद्र शासनाकडून सन 2021-22 व 2022-23 करिता एकुण र. रु.22 कोटी इतके अनुदान शहरास प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने आज महापालिकेचे आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोलापूर शहरातील पुना नाका, तुळजापूर नाका, रूपा भवानी चौक, शांती चौक, जुळे सोलापूर अश्या नियोजित रस्ते ठिकाणांची पाहणी केली.सोलापूर शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात काही ठिकाणी झाडें लावण्या बरोबरच वॉटर फाउंटेन व वॉटर कर्टन,हरित पट्टे तयार करण्यात येणार आहे.
यासह हवेच्या वाढणाऱ्या प्रदूषण पातळीला नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, सहाय्यक अभियंता तफन डंके, पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलंकर आदी अधिकारी उपस्थित होते.