No Result
View All Result
- ताडोबातील वाघांनी देशविदेशातील नामांकित व्यक्तिमत्वांना सहज दर्शन देऊन भुरळ घातली. म्हणूनच त्यांची पावले वारंवार या व्याघ्रप्रकल्पाकडे वळतात. या व्याघ्रप्रकल्पाच्या निमढेला प्रवेशद्वारावरील उत्तम व्यवस्थापनाने अलीकडच्या काही महिन्यात वाघांची संख्या वाढली. त्यामुळे वाघांचे सहज होणारे दर्शन पर्यटकांना या प्रवेश द्वाराकडे आकर्षित करत आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचीही पावले सोमवारी सकाळी निमढेला प्रवेशद्वाराकडे वळली आणि वाघांच्या दर्शनाने ते रोमांचित झाले.
- निमढेलातील उत्तम व्यवस्थापनामुळे येथे येणाऱ्या कोणत्याही पर्यटकांना वाघ निराश करत नाही. “भानुसखिंडी” ही वाघीण आणि तिच्या चार बछड्यांनी पर्यटकांना आनंद देण्याचा जणू विडा उचलला आहे. इतक्या सहज हे कुटुंब पर्यटकांसमोर येते. त्यापाठोपाठ “झरणी” आणि तिच्या दोन बछड्यांनी देखील पर्यटकांची कधीच निराशा केली नाही. “छोटा मटका” तर निमढेला प्रवेशद्वाराचा “आयकॉन” झाला आहे. त्यामुळे त्यांची महती ऐकून तेंडुलकर कुटुंबाची पावले सोमवारी सकाळी निमढेलाकडे वळली. इथल्या व्याघ्रदर्शनाने हे जोडपे रोमांचित झाले. हे व्याघ्रदर्शन म्हणजे आमच्यासाठी रोमांचकारी अनुभव होता, असा रिमार्क देखील ते देऊन गेले. एवढेच नाही तर निमढेला व्यवस्थापनाची आणि विशेषकरून वनरक्षकांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.
No Result
View All Result