सोलापूर – 19 फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा एकत्व सोशल फाउंडेशन वतीने बाल मनात शिव संस्काराची पेरणी होऊन शिवचरित्राचा जागर व्हावा यासाठी गुळवंची गावामध्ये अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आले होती.
या अभिवाचनासाठी इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील शिवरायांचे बालपण, शिवरायांचे शिक्षण, स्वराज्याचे तोरण बांधले, प्रतापगडावरील पराक्रम, गड आला पण सिंह गेला, एक अपूर्ण सोहळा, दक्षिणेतील मोहीम या पाठापैकी कोणत्याही एका विद्यार्थ्याला एका पाठाचे अभिवाचन देण्यात आले. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भगवा शेला व भगवा टोपी घालून विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. या स्पर्धेमध्ये सि. सद्गुरु अण्णा माऊली शाळा. ज रा चंडक प्रशाला बाळे. जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल, कोंडी. छत्रपती शिवाजी प्रशाला स्कूल सोलापूर या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार वाघमोडे, पूजा पाटील, स्नेहा भोसले, श्रवण निळ, प्रतीक्षा निळ, ओम देवकते, शहाबाज मकानदार, पिरप्पा कोळी, दीपक करकी यांनी परिश्रम घेतले.