विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर व स्पर्शरंग कला परिवाराच्यावतीने अनोखे अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने चित्रकार व विश्वविक्रमवीर विपुल मिरजकर व स्पर्शरंग कला परिवाराच्यावतीने दरवर्षी महाराजांना कलेतून अभिवादन करण्यात येते. याहीवर्षी एका वेगळ्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. ज्या शिवछत्रपतीच्यामुळे अखंड हिंदुस्थानातील स्त्रियांचे सौभाग्य अबाधित राहिलं त्या केली आहे. प्रत्येक स्त्रीने अभिमानाने सौभाग्याचे लेणं अभिमानाने आपल्या कपाळी ल्यावं हीच भावना प्रत्येक स्त्रीच्या मनात असेल ,यासाठी चित्रकार विपुल मिरजकर यांनी सात महिलांच्या कपाळावरती दीड इंच आकारात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारली. प्रत्येक महिलांच्या कपाळावर प्रतिमा साकारण्यासाठी दहा मिनिटाच्या कालावधी लागलेली आहे, असे सर्व सात महिलांना प्रतिमा साकारण्यासाठी त्यांना दीड ते दोन तास इतका वेळ लागलेला आहे. या प्रतिमेसाठी त्यांनी पोस्टर कलरचा उपयोग केलेला आहे व यासाठी प्राचार्य विशाल काळे सर यांनी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्पर्श रंग कला परिवारातील शुभम सब्बन, वैष्णवी चराटे यांनी ही याकामी मदत केली असल्याचं त्यांनी सांगितलं.