श्री गजानन महाराज यांचा १४५ वा.प्रकटदिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम करुन हजाऱ़ो भक्त गणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रकटदिनानिमत्त श्रीं च्या दर्शनासाठी पहाटे पासून.सुरु असलेली गर्दी रात्री उशिरापर्यंत चालूच होती. गेल्या तीन दिवसापासून विविध. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते.
सोमवार दि. १३ रोजी सकाळी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे व कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर यांच्या हस्ते श्रीं च्या मुर्तीस दुग्धपंंच्यामृत महाअभिषेक व महारुद्र पुजा करण्यात आले. त्यानंतर श्री गजानन विजय सामुहिक पारायण, महाराजांची बावन्नी अष्टक, २१ दुर्वांकुरानी पारायणाची सांगता शोभा साठे यांच्या हस्ते संपन्न झाली. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त व भक्तगणांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी म्हणून दमाणी रक्त संकलनच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिराचे आयोजन चांगल्या प्रकारे करण्यात आला; त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तीन दिवसीय कार्यक्रमात ज्ञानदा महिला भजनी मंडळ दमाणी नगर प्राजक्ता महिला भजनी मंडळ, द्वारकाधिश महिला भजनी मंडळ, मुक्ताई महिला भजनी मंडळ, विणाप्रसाद महिला भजनी मंडळ, स्वरा महिला भजनी मंडळ, सिध्दीविनायक महिला भजनी मंडळ, दुर्गा महिला भजनी मंडळ यांनी सहभाग नोंदविला.
मंडळामार्फत मंडळ मार्फत महाप्रसादाचे आयोजन
15000 पेक्षा अधिक भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला.श्रीं च्या दर्शनासाठी सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ बार्शी अक्कलकोट येथून देखील अनेक भाविक आल्याचे दिसून आले. यंदाच्या वर्षी मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होईल हे लक्षात घेऊनच मोफत पादत्राणे स्टॅन्ड, मंडप व संपूर्ण पादत्राणे सेवा श्रीकांत ठेंगील यांनी केली. श्रीच्या दर्शनाची व्यवस्था पारायण महाप्रसाद मंडप इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे व कार्यवाह गुरुलिंग यांनी अतिशय परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास गोकाक, विजयकुमार रघोजी, सुहास गुडपल्ली, तुकाराम जाधव, नारायण जोशी तसेच महेश अक्कलकोटे, पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी वीरभद्र माळगे, अविनाश केतकर, तुकाराम सोनाळे, हेमंत परळिकर, हेमंत वैद्य, मधुसूदन क्षिरसागर, मोहन भालवणकर, वर्षा भावार्थी, वैरागहून खास सेवेसाठी आलेल्या उज्वला खरात यांनी परिश्रम घेतले.
यावर्षी मंदिरात सुमारे दोन टन फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. पांढरा आणि केसरी, पिवळी जरबेरा, आँरकीड, झेंडू, गुलाब आदी विविध फुलांचा वापर करून मोठ्या खुबीने सजावट करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर व गाभाऱ्याला अधिक सौंदर्य प्राप्त झाले. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी संस्कार भारतीचे कलाकार आनंत देशपांडे व विनायक बोड्डू यांनी सभागृहात अत्यंत उत्कृष्टपणे रांगोळी काढण्यात आली. यावेळी दुचाकी व चार चाकी वाहनतळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती; जी सेवा भंडारी वरिष्ठ पोलिस यांनी पार पाडली.