No Result
View All Result
- सोलापूर – दिनांक ३१/०१/२०२३ रोजी सकाळी ०६.०० वा चे सुमारास, आशिष पद्माकर पाटोदेकर (वय ३० वर्षे, व्यवसाय व्यापार, राहणार २०४ /अ, दक्षिण कसबा, शनि मंदिर जवळ, सोलापूर) हे त्यांचे कुटुंबीयां सोबत ( आई, वडिल व पत्नी यांचे सह) कामा निमीत्त पुणे येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचे घराची चावी, त्यांचे आईची मैत्रीण यांचेकडे दिलेली होती. दि.०१/०२/२०२३ रोजी पहाटे ०१.३० वा. चे सुमारास अशिष पाटोदेकर व त्यांचे वडिल घरी आले असता, त्यांचे घराचे मुख्य दार हे उघडे असलेले दिसले. त्यामुळे त्यांना संशय आल्याने, त्यांनी प्रथमदर्शनी घराचे पहिल्या मजल्यावरील बेडरूम मधील कपाट चेक केले असता, त्यातील सुमारे ४५,००,०००/- रू रोख रक्कम चोरी झाल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५८/२०२३ भादवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तसेच गुन्हा दाखल झाले नंतर फिर्यादी यांचे आई व पत्नी यांनी त्यांचे घरातील दागीने तपासले असता, सुमारे २१ तोळे सोन्याचे दागीने व आणखीन ५,९०,५००/-रू रोख चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे एकंदरीत रोख रक्कम ५०,९०,५००/- रू व २१ तोळे सोन्याचे दागीने (१०,५०,००० /- रूपयाचे) असा एकुण ६१,४०,५००/- रूपयेचा ऐवज घरफोडी मध्ये चोरी गेलेला होता.
- वर नमुद फिर्यादी यांचे राहते घर हे तीन मजली आहे. नमुद घराचे कम्पाऊंन्डला लोखंडी गेट असुन, त्यास कुलुप लावुन बंद केलेले होते. तसेच घराचे मुख्य दरवाज्याला आतुन व बाहेरून दोन दरवाजे असुन, ते दोन्ही दरवाजे लॅच कुलुपाने बंद केलेले होते. त्याच प्रमाणे घराचे पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम असुन, त्याच्या चाव्या या, तळमजल्यावरील टि.व्हि टेबलचे ड्रॉव्हर मध्ये ठेवलेल्या होत्या. घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा, कम्पाऊंन्डचे लोखंडी गेटचे कुलुप, मुख्य दरवाज्याची दोन्ही कुलपे, तसेच बेडरूमचे कुलुप हे तुटले नसल्याचे आढळले. एकंदरीत, बेडरूममधील ज्या कपाटातुन रोख रक्कम व दागीने चोरी झाले, तेथपर्यंत पोहचण्यासाठी, चार लॉक उघडावे लागत होते. मात्र, ते सर्व लॉक सुस्थितीत होते. यावरून बनावट चावीने अथवा फिर्यादीचे घराची माहीती असलेल्या जवळच्या व्यक्तीने, चोरी केल्याचा संशय बळावला.
- त्यानुसार, फिर्यादीचे घरी येणारे त्यांचेकडील सर्व कामगार तसेच चालक यांचेकडे वपोनि / सुनिल दोरगे, सपोनि / संजय क्षिरसागर व त्यांचे पथकामधील अंमलदार यांनी तपास केला असता, घटनेच्या सुमारे १५ दिवस आगोदर, फिर्यादी यांचे कडुन एका ड्रायव्हरने नोकरी सोडल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, त्या नोकरी सोडलेल्या ड्रायव्हरचे नाव उमाकांत ऊर्फ उमेश बाबु यादव, वय ३० वर्ष, रा. सुलेर जवळगे, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, घटनेच्या वेळी त्याचे ठाव ठिकाण्या बाबत इतर त्याचे मित्रांकडुन माहीती घेतली असता, तो सर्वाना वेगवेगळी माहीती देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून, त्याचे वर्तना बाबत संशय बळावला. त्यानंतर त्याचा त्याचे राहते घरी तसेच त्याचे नातेवाईकांकडे शोध घेतला असता, तो मिळुन आला नाही. त्याच प्रमाणे, उमाकांत यादव याचे बाबत, तांत्रिक विश्लेषण केले असता, गुन्हा घडते वेळी, तो गुन्हयाचे ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, गुन्हयातील त्याचा सहभाग निश्चीत झाला. त्याच प्रमाणे गुन्हे शाखेकडील सपोनि / सोळुंके व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी बातमीदारा मार्फत माहीती काढली असता, त्याने सोने देखील चोरले असले बाबत माहीती मिळाली.
- आरोपी उमाकांत यादव याचा गुन्हयातील सहभाग निश्चीत झाल्या नंतर त्याचा शोध, गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पुन्हा एकदा त्याचे राहते घरी व नातेवाईकांकडे घेतला परंतु तो मिळुन आला नाही. त्यानंतर, सपोनि / संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथकामधील अंमलदार यांनी, उमाकांत यादव याचे घरातील व्यक्तींचे हालचालीवर, गुन्हा घडल्या पासुन लक्ष ठेवले होते. सपोनि / संजय क्षिरसागर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, उमाकांत यादव हा पुणे येथील मार्केट यार्ड परीसरातील एका लॉजवर थांबला आहे. त्यामुळे, दि.०३/०२/२०२३ रोजी सपोनि / संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथक तातडीने पुणे येथे रवाना झाले. पुणे येथे गेल्यानंतर, सपोनि / संजय क्षिरसागर व त्यांचे तपास पथकाने मार्केट यार्ड परीसरातील सुमारे ८ ते १० लॉज चेक केले असता, सातारा रोडवरील हॉटेल उत्सव लॉज समोर, उमाकांत यादव हा उभा असल्याचे दिसुन आले. त्यामुळे, त्यास लागलीच पकडले असता, त्याने हॉटेल उत्सव येथे राहत असल्याचे सांगीतले. त्यानुसार, त्यास ताब्यात घेऊन, हॉटेल उत्सव मधील रजिष्टर ची पाहणी केली असता, त्यामध्ये उमाकांत यादव याचे नावाची नोंद आढळुन आली. त्यानंतर, उमाकांत यादव हा, हॉटल उत्सव मध्ये राहात असलेल्या रूम नंबर २०९ ची झडती घेतली असता, त्याचे रूम मध्ये घर फोडीत चोरीस गेलेली रोख रक्कम ५०,९०,५००/-रू ही एका लाल रंगाचे ट्रव्हलींग बॅग मध्ये मिळुन आली. ती सपोनि / संजय क्षिरसागर यांनी पंचनाम्या अन्वये जप्त करून ताब्यात घेतली आहे.
- आरोपी उमाकांत यादव, याचेकडुन गुन्हयात चोरीस गेलेली वरील रक्कम पुणे येथे जप्त केल्यानंतर त्यास सोलापूर येथे आणुन गुन्हयामध्ये सपोनि / संजय क्षिरसागर यांनी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी उमाकांत यादव याची मा. न्यायालयाकडुन ०७ दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाल्यानंतर, त्याचेकडे चोरीचे २१ तोळे सोन्याचे दागीने बाबत कौशल्याने तपास केला असता, त्याने ते दागीने, त्याचे मजरेवाडी येथील भाडयाचे घरामध्ये ठेवल्याचे सांगुन ते पंचनाम्या अन्वये काढुन दिल्याने ते सर्व २१ तोळे दागीने (१०,५०,०००/- रू किंमतीचे) जप्त करण्यात आलेले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / संजय क्षिरसागर हे करीत असुन, आरोपीस सात दिवस पोलीस कोठडी मंजुर आहे.
- व्यापारी वर्गाने त्यांचे घराचे मुख्य प्रवेशद्वारावर तसेच, घराकडे येणाऱ्या रस्त्याचे बाजूने, चांगल्या प्रतीचे नाईट व्हिजन असलेले सी सी टी व्हि कॅमेरे लावावेत. घरातुन बाहेरगावी जाताना घरातील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागीने बँक लॉकरमध्ये ठेवावेत. घराच्या चावीचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेरगावी जाताना, रोख रक्कम व मोल्यवान दागीने बँक लॉकरमध्ये ठेवणे शक्य नसल्यास, घराचे सुरक्षीततेसाठी सिक्युरीटी गार्डची नेमणूक करावी असे आवाहन गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.
- सदरची कामगिरी डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे / विशा), प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, वपोनि. (गुन्हे) / सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक/संजय क्षिरसागर, सपोनि / नंदकिशोर सोळुंके, कृष्णात कोळी, महेश शिंदे, प्रकाश गायकवाड, राजु मुदगल, कुमार शेळके, वसिम शेख, संतोष मोरे, तात्यासाहेब पाटील, भारत पाटील, निलेष शिरूर, अजय गुंड, प्रविण शेळकंदे, निलोफर तांबोळी, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे, सुमित्रा बारबोले, चालक सतिश काटे, काळे यांनी पार पाडली आहे.
No Result
View All Result